लोकनेते स्व.विनायकराव मेटे यांच्या प्रयत्नाने मंजुर श्री.कंकालेश्वर मंदिर विविध विकास कामांचे भुमिपूजन संत महतांच्या उपस्थितीत होणार संपन्न…
नागरिक व भाविक भक्तांनी उपस्थित राहण्याचे आवाहन श्री कंकालेश्वर मंदिर ट्रस्ट व शिवसंग्रामच्या वतीने करण्यात येत आहे.
कंकालेश्वर मंदिर 04 कोटी रुपयाच्या विविध विकास कामाचे भूमिपूजन..
बीड. (वार्ताहर ): लोकनेते स्व. विनायकराव मेटे साहेब यांच्या प्रयत्नाने मंजुर प्रदेशिक पर्यटन विकास योजनेतंर्गत सन 2018 -19 मधील 408.19 लक्ष रुपयांच्या श्री.कंकालेश्वर मंदिर विविध विकास कामांचा भुमिपूजन सोहळा उद्या सोमवार,दि. 11 सप्टेंबर रोजी सकाळी 10.30 वा.डॉ.ज्योतीताई विनायकराव मेटे व संत महंतांच्या प्रमुख उपस्थितीत कंकालेश्वर मंदिर येथे संपन्न होणार आहे.
बीड शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आपण नेहमी कटिबद्ध राहणार असल्याची ग्वाही देणारे लोकनेते स्व.विनायकराव मेटे यांच्या प्रयत्नातून पर्यटन विकासास चालना मिळावी यासाठी सन 2018 -19 मधील 408.19 लक्ष रुपयांचा निधी उपलब्ध करून दिलेला आहे.श्री.कंकालेश्वर मंदिर विविध विकास कामांच्या भूमिपूजन कार्यक्रमास ह.भ.प.शिवाजी महाराज (श्रीक्षेत्र नारायणगड), ह भ प नवनाथ महाराज ( श्रीक्षेत्र गोरक्षनाथ टेकडी),महादेव महाराज (श्रीक्षेत्र चाकरवाडी), ह भ प लक्ष्मण महाराज मेंगडे( बंकट स्वामी संस्थान ), ह.भ.प महादेव महाराज भारती( बेलेश्वर संस्थान ), ह.भ.प हरिहर महाराज भारती ( मोरेश्वर संस्थान ), ह.भ.प नवनाथ महाराज (हरकूबाबा संस्थान), ह.भ.प योगीराज महाराज ( रामगड संस्थान ), ह.भ.प श्रीहरी महाराज पवार( श्री दत्त संस्थान, कोल्हारवाडी) ह.भ.प भक्तीदास महाराज( संत श्री तुकाराम महाराज संस्थान ), ह.भ.प श्रीरंग महाराज डोंगरे (गौतम ऋषी संस्थान), ह.भ.प नारायण महाराज डिसले( ज्ञानेश्वर आश्रम, दगडवाडी)ह.भ.प विनायक महाराज पाटांगणकर (जनी जनार्दन संस्थान बीड ), ह भ प एकनाथ महाराज पुजारी (श्री विठ्ठल मंदिर पेठ बीड), ह भ प आशिषानंद महाराज (धारूरकर), ह भ प संजय कल्याण महाराज गुरव (श्री कंकालेश्वर मंदिर), ह भ प अमृताश्रम स्वामी महाराज (नवगण राजुरी) या संत महतांच्या उपस्थिती लाभणार आहे.श्री कंकालेश्वर मंदिर ट्रस्ट,बीड व शिवसंग्राम बीड जिल्हाच्या वतीने नागरिक व भाविक भक्तांना उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.