श्री क्षेत्र चाकरवाडी मध्ये सोमवार पासुन बाळनाथ महाराजांच्या पालखी सोहळ्यास सुरुवात..
- श्री क्षेत्र चाकरवाडी मध्ये सोमवार पासुन बाळनाथ महाराजांच्या पालखी सोहळ्यास सुरुवात..
- बीड प्रतिनिधी – प्रति वर्षाप्रमाणे विसाव्या शतकातील महान संत ह. भ. प ज्ञानेश्वर माऊली महाराज चाकरवाडीकर यांच्या आशीर्वादाने चालत असलेल्या श्री गुरु तपोनिधी चैतन्य बाळनाथ महाराजांच्या पालखी सोहळ्यानिमित्त अखंड हरिनाम सप्ताहास सोमवारपासून सुरुवात झाली आहे. दिनांक 28 ऑगस्ट 2023 पासुन ते दिनांक 4 ऑगस्ट 2023 अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व कार्यक्रम ह. भ.प. महादेव महाराज तात्या बाळनाथ माऊली संस्थान श्रीक्षेत्र चाकरवाडी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडतील. चालत असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये आठ दिवस महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार यांचे कीर्तन रात्री 9 ते 11 या वेळेमध्ये होणार आहेत. तरी सर्वांनी होणाऱ्या कीर्तन श्रावणाचा लाभ घ्यावा.
- पहाटे ४ ते ६ काकडा भजन, सकाळी ७ ते १० ज्ञानेश्वरी पारायण, १० ते १२ गाथा भजन, १२ ते २ भोजन, ४ ते ५ ज्ञानेश्वरी प्रवचन, ५ ते ६ हरिपाठ, रात्री ९ ते ११ हरिकिर्तन, ११ ते ४ संगीत भजन व जागर असे कार्यक्रम आठ दिवस चालु राहतील आणि दि. ४ सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी ९ वाजता पालखी मिरवणुकीस सुरुवात होईल. श्री बाळनाथ महाराजांच्या पालखी विसर्जनानंतर महाप्रसाद होईल. तरी या सर्व होणाऱ्या कार्यक्रमाचा व महाप्रसादाचा लाभ घेण्याचे आवाहन सर्व ग्रामस्थ मंडळी श्री क्षेत्र चाकरवाडी आणि तपोनिधी गुरुवर्य महादेव महाराज तात्या यांनी केले आहे. तसेच सायंकाळी ५ ते ८ या वेळेमध्ये गुरुवर्य तपोनिधी महादेव महाराज तात्या यांचे काल्याचे किर्तन होईल.
error: Content is protected !!