11.6 C
New York
Sunday, May 25, 2025

Buy now

spot_img
spot_img

बीड शहरात अनधिकृत बॅनरच्या विरोधात सामाजिक कार्यकर्ते आक्रमक.. 

बीड शहरात अनधिकृत बॅनरच्या विरोधात सामाजिक कार्यकर्ते आक्रमक.. 

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बुजगावने आंदोलन…

बीड प्रतिनिधी – बीड शहरातील अनधिकृत बॅनरच्या विरोधात सामाजिक कार्यकर्त्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बुजगावणे आंदोलन केलं. राजकीय सभांच्या अनुषंगाने बीड शहरामध्ये मुख्य रस्त्यावर मोठमोठे बॅनर लागल्याने अपघात घडत आहेत तसेच वाहतूक कोंडीची समस्या देखील निर्माण होत आहे. या संदर्भात नगरपालिका प्रशासन आणि जिल्हा प्रशासन या अनाधिकृत बॅनर संदर्भात कारवाई करत नसल्याने सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रशासनाच्या विरोधात काळे चष्मे घालून निषेध व्यक्त केला.

यावेळी घोषणाबाजी करण्यात आली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सभेसाठी आठवडाभरापासून अनाधिकृत होर्डिंग्ज व धुळे ते सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर छिंद्र पाडुन लोखंडी कमानीमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत असुन अपघाताला निमंत्रण असुन संबंधित प्रकरणात निवेदन देऊन सुद्धा कारवाईस जाणीवपूर्वक टाळाटाळ करणाऱ्या नगरपरिषद, सार्वजनिक बांधकाम, जिल्हा प्रशासनाच्या बुजगावण्या धोरणाच्या निषेधार्थ सामाजिक कार्यकर्त डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बुजगावण्याला हार घालत,नारळ फोडुन उद्बत्ती लावुन घोषणाबाजी करण्यात येऊन निवेदन जिल्हाधिकारी बीड यांच्या मार्फत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितिनजी गडकरी, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन देण्यात आले.यावेळी आंदोलनात शेख युनुस, मिलिंद सरपते,अजय सरवदे,अशोक येडे,रामधन जमाले, बलभीम कुटे, शेख मुबीन, किष्किंधाताई पांचाळ, बलभीम उबाळे,सुदाम तांदळे आदि.सहभागी होते.

Related Articles

Latest Articles

error: Content is protected !!