16.9 C
New York
Friday, May 17, 2024

Buy now

अजित पवार आमचेच नेते शरद पवार यांचे वक्तव्य..

अजित पवार आमचेच नेते शरद पवार यांचे वक्तव्य..

मुंबई प्रतिनिधी – राष्ट्रवादीत फूट नसून अजित पवार आमचेच नेते आहेत, असे वक्तव्य राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी बारामतीत बोलताना केले आहे. त्यांच्या या वक्तव्याने राजकीय वतुर्ळात चर्चेला उधाण आले आहे. अजित पवार आमचे नेते आहेत. आमच्यात वाद नाही. राष्ट्रवादीत फूट नाही. त्यात अलीकडेच अजित पवार हे आमचे नेते आहेत. राष्ट्रवादीत फूट पडली नाही, असे वक्तव्य राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केले होते. आता या वक्तव्याला दुजोरा देणारे वक्तव्य शरद पवार यांनीही केले आहे.

बारामतीत पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, ‘अजित पवार यांनी वेगळा निर्णय घेतला म्हणून फूट पडली नाही. कुणाला कोणता वेगळा निर्णय घ्यावा लागला तर तो लोकशाही नुसार त्याचा अधिकार आहे.’ शरद पवारांच्या या विधानाने एकूणच संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. शरद पवार आज सातारा जिल्ह्यातील दहिवडीत सकाळी पवारांची जाहीर सभा आहे तर संध्याकाळी ४ वाजता कोल्हापुरात त्यांची सभा होणार आहे.

Related Articles

Latest Articles

error: Content is protected !!