19.1 C
New York
Sunday, May 25, 2025

Buy now

spot_img
spot_img

अंगणवाडी शिक्षिकेचा नवऱ्याने केला खून ; खोऱ्याचा दांडा डोक्यात घालुन खून.. 

अंगणवाडी शिक्षिकेचा नवऱ्याने केला खून..

खोऱ्याचा दांडा डोक्यात घालुन नवऱ्याने केला बायकोचा खून.. 

बीड प्रतिनिधी – बीड तालुक्यातील धावज्याचीवाडी येथील गुंडीराम भोसले नामक व्यक्तीने आपल्या स्वतःच्या बायकोचा खून केला. पहाटेच्या दरम्यान मंगल भोसले या शेतामध्ये गेल्या होत्या. गोठ्यामध्ये काम करण्यास गेले असता मंगल भोसले यांचे पती गुंडी राम भोसले याने खोऱ्याच्या दांड्याने मंगल भोसले यांचा खून केला. खून केल्यानंतर गुंडीराम भोसले हे नेकनूर पोलीस स्टेशन मध्ये आले. सकाळी नेकनूर पोलीस ठाण्यात दैनंदिन कामे सुरू होती. पोलीस कर्मचारी काही स्थानिकांच्या तक्रारी ऐकत होते. तेवढ्यात गुंडीराम भोसले पोलीस स्टेशनमध्ये आला. समोर बसलेल्या अधिकाऱ्याने काय काम आहे असे विचारल्यानंतर गुंडीराम भोसले यांनी साहेब मी माझ्या बायकोला मारून आलोय, मला अटक करा असे चेहऱ्यावर शांत भाव ठेवून त्यांनी सांगितले. यानंतर पोलिसांनी ताबडतोब घटनास्थळी धाव घेतली. गुंडीराम भोसले वय – 50 असे आरोपीचे नाव आहे गुंडराम भोसले यांनी ठाण्यात येण्याचा अगोदर पत्नी मंगल भोसले यांचा शेतातील गोठ्यावर डोक्यात खोऱ्याचा दांडा घालून खून केला. मंगल भोसले या अंगणवाडी का शिक्षिका होत्या. सकाळी त्या शेतातील काम आटोपण्यासाठी गेल्या होत्या. ही घटना सकाळी सातच्या दरम्यान उघडकीस आली. मंगल भोसले यांना एक मुलगी आणि एक मुलगा आहे. मुलाचे चार वर्षांपूर्वी लग्न झाले होते. घटनास्थळी सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत, नेकनूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास हजारे, पोलीस उपनिरीक्षक नितीन गट्टूवार आणि नेकनूर पोलीस स्टेशनचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आणि तपासास सुरुवात केली. मृतदेह शविच्छेदनासाठी स्त्री रुग्णालय नेकनूर या ठिकाणी नेण्यात आला आहे. खून का केला आहे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

Related Articles

Latest Articles

error: Content is protected !!