9.8 C
New York
Friday, May 23, 2025

Buy now

spot_img
spot_img

मोतीराम नाना खांडे अनंतात विलीन..!

मोतीराम नाना खांडे अनंतात विलीन..!

बीड प्रतिनिधी – तालुक्यातील म्हाळस जवळा गावचे रहिवासी मोतीराम तुकाराम खांडे (५२) यांचा दि. १२ ऑगस्ट रोजी सायंकाळी बीड नाथापूर रोडवर म्हाळस जवळा नजीक चार चाकी कार चा भीषण अपघात झाला होता या अपघातात दोघे जण गंभीर जखमी झाले होते, याच अपघातात मोतीराम खांडे हे गंभीर जखमी झाले होते.

अपघातानंतर त्यांना बीड येथे उपचारासाठी नेण्यात आलें होते मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथे हलविण्यात आले. गेल्या नऊ दिवसांपासून मोतीराम खांडे यांच्यावर उपचार सुरू होते, डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले मात्र अपघातात त्यांना मार जास्त लागल्याने डॉक्टरांनी प्रयत्न अयशस्वी ठरले आणि आज दि.२१ ऑगस्ट २०२३ रोजी त्यांची औरंगाबाद येथील रुग्णालयात प्राणज्योत मालवली. मोतीराम नाना खांडे यांना दोन भाऊ, एक बहीण, दोन मुले एक मुलगी, पत्नी पुतणे असा मोठा परिवार आहे. मोतीराम खांडे हे म्हाळस जवळा गावचे शांत आणि सय्यमी व्यक्ती म्हणून ओळखले जायचे, फार कष्टाने सर्व प्रपंच उभा केला होता, मुलांचे शिक्षण, शेती आणि व्यावसाय यामध्ये ते गुंतलेले असायचे. स्वतःचे कृषी सेवा केंद्र चालवायचे त्यामाध्यमातून शेतकऱ्यांना ना नफा ना तोटा याप्रमाणे कीटकनाशके, खाद, बी-बियाणे पुरवण्याचे काम ते गेल्या अनेक वर्षांपासून करत होते. गावातील युवकांना प्रेरणादायी मार्गदर्शन, व्यावसायात योग्य मार्गदर्शन द्यायचे तसेच, देशातील तमाम बहुजन महापुरुषांच्या जयंती न चुकता ते करायचे, सर्व जातीधर्माच्या लोकांना सोबत घेऊन गावात सलोखा कसा राहील यासाठी त्याचे सतत प्रयत्न असायचे. आज मोतीराम खांडे यांच्या अशा जाण्याने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, गावातील व पंचक्रोशीतील नागरिक हळहळ व्यक्त करत आहते.आज दि. २१ रोजी म्हाळस जवळा शिवारात मोतीराम खांडे याना जड अंतकरणाने हजारोंच्या संख्येने उपस्थित राहून अखेरचा निरोप दिला.

Related Articles

Latest Articles

error: Content is protected !!