9.8 C
New York
Friday, May 23, 2025

Buy now

spot_img
spot_img

डॉ.बाबुराव जोगदंड यांच्या नेतृत्वाखाली बालाघाटावरील राष्ट्रवादी संदीप क्षीरसागर यांच्या बाजुने

डॉ.बाबुराव जोगदंड यांच्या नेतृत्वाखाली बालाघाटावरील राष्ट्रवादी संदीप क्षीरसागर यांच्या बाजुने

सामाजिक चळवळीतील अनेक कार्यकर्ते डॉ.जोगदंड यांच्या पाठीशी

बीड प्रतिनिधी – राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये उभी फुट पडल्यानंतर पक्षाचे दोन्ही गट आपली शक्ती वाढविण्यासाठी प्रयत्नशील आहेत यातच समाजरत्न पुरस्कार प्राप्त लोकनेते डॉ.बाबुरावजी जोगदंड यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बालाघाटावरती आमदार संदीप क्षीरसागर यांच्या बाजुने पुन्हा एकदा उभी राहिली आहे . डॉ.बाबुराव जोगदंड हे आमदार संदीप क्षीरसागर यांचे एकनिष्ठ मानले जातात पुन्हा एकदा त्यांच्या शिलेदारांनी विश्वास संपादन केला आहे.

बीड जिल्ह्यात बहुतांश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही आमदार संदीप क्षीरसागर यांच्या पाठीशी उभी राहिल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. युवा वर्ग हा मोठया प्रमाणावर आमदार संदीप क्षीरसागर यांच्या पाठीशी असुन बालाघाटावरील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही आमदार संदीप क्षीरसागर यांच्या पाठीशी उभी करण्यात डॉ.बाबुरावजी जोगदंड यांना यश आले आहे.बालाघाटावरील विविध गावांतील वाडी-वस्तीवरील कार्यकर्त्यांची फौज आज डॉ.बाबुरावजी जोगदंड यांच्या शब्दावर कुमक करीत आहे.बालाघाटावर शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा प्रभाव वाढला आहे.त्यामुळे बीड मतदारसंघावर आमदार संदीप क्षीरसागर यांचीच हवा राहणार असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.

युवा कार्यकर्त्यांची मोठी फळी उभा

बालाघाटावर विविध गावांमध्ये युवा कार्यकर्त्यांची फळी मोठ्या प्रमाणावर आमदार संदीप क्षीरसागर यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली असुन सामाजिक चळवळीतील विवेक कुचेकर, बाळासाहेब राऊत,पंजाब वाघमारे, सुधीर नाईकवाडे,कुणाल जाधव,रेवण मोरे , दत्ता जाधव यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर डॉ.बाबुरावजी जोगदंड यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे काम जोमाने करत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.

Related Articles

Latest Articles

error: Content is protected !!