20.3 C
New York
Monday, May 20, 2024

Buy now

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नन्नवरे गोठा येथील नवनियुक्त शिक्षकांचा सत्कार…!

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नन्नवरे गोठा येथील नवनियुक्त शिक्षकांचा सत्कार…!

बीड प्रतिनिधी – बीड तालुक्यातील सर्वात मोठी बाजार पेठ नेकनुर म्हणुन ओळखले जाते. नेकनुर येथील नन्नवरे वस्ती येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नन्नवरे गोठा या ठिकाणी l रवींद्र भड सर यांना निरोप देताना व सचिन राऊत सर यांची जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नन्नवरे गोठा येथे नवनियुक्त झाल्याबद्दल दोन्ही शिक्षकांचा यावेळी नन्नवरे वस्ती येथील नागरिकांनी सत्कार केला.

रवींद्र भड सर यांनी अनेक विद्यार्थी या शाळेमधून घडवले. स्वभावाने सुंदर असणारे सर सोडून जात असल्यामुळे वस्तीवरील नागरिकांना अश्रू अनावर झाले. यावेळी दोन्ही शिक्षकांचा ह्रदय सत्कार समारंभ संपन्न झाला. यावेळी ग्रामपंचायत सदस्य बाबुराव नन्नवरे, माजी ग्रामपंचायत सदस्य विजय नन्नवरे, सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन पांडुरंग कानडे, चंद्रकांत नन्नवरे, श्रीधर नन्नवरे, लहू महाकले, भिकाजी कानडे, भास्कर नन्नवरे, नंदू नन्नवरे, बिबीशन शिंदे, नारायण नन्नवरे, दत्ता कानडे तसेच वस्तीवरील सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Latest Articles

error: Content is protected !!