तलाठी भरतीच्या नावावर लूटमार- विशाल वंजारे
बीड – तलाठी भरती च्या निमित्ताने आरक्षण उद्धवस्त करण्यात आले आहे. खुल्या प्रवर्गासाठी 1000/- रुपये तर मागासवर्गीयांसाठी 900/- रुपये फिस ठेवली आहे, हा शंभर रुपयाचा फरक नावापुरता केला आहे. या परीक्षा पण खासगी झाल्या आहेत, आणि इतर पद भरती मध्ये सुद्धा फिस बंद कराव्यात अशी मागणी वंचितचे विशाल वंजारे यांनी केली.
सरकार अशीच लूटमार करत आहे.तर यावरील अतिरीक्त गोरगरीब शेतमजुरांच्या लेकरानी परीक्षा देईची की नाही? पेपर नाही तर ऑनलाईन परीक्षा होणार आहे. परीक्षा घेण्यासाठी असा कोणता खर्च लागणार आहे?
नोकऱ्या देण्याच्या नावाखाली लुटमार सुरू आहे. खाजगी सेंटर परीक्षा घेतय त्यामुळे आपोआप फीस मधील सुटीचे आरक्षण उद्धवस्त केले आहे. याचा वंचित बहुजन आघाडी निषेध करत आहे. आणि सरकारने जर अतिरिक्त फिस बंद नाही केल्या तर मोठे आंदोलन महाराष्ट्र भर करण्यात येईल.