30 C
New York
Monday, July 21, 2025

Buy now

spot_img
spot_img

अनिलदादा जगताप आज शेतक-यांना वेठीस धरणाऱ्या पं. स. मधील अधिकाऱ्यांचा घेणार समाचार..!

अनिलदादा जगताप आज शेतक-यांना वेठीस धरणाऱ्या पं. स. मधील अधिकाऱ्यांचा घेणार समाचार..!

शिवसैनिकांनी तथा शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे – अनिलदादा जगताप

♦️निवासी संपादक-दिपक वाघमारे 

बीड दि,24 :  गेल्या काही दिवसांपासून बीड तालुक्यातील पंचायत समितीचे अधिकारी तथा कर्मचारी शेतकरी बांधवांची निरर्थक लूट करत असल्याच्या तक्रारी शिवसेना जिल्हाप्रमुख मा. अनिलदादा जगताप यांच्याकडे होत आहेत. बीड तालुका पंचायत समितीच्या अनागोंदी कारभारामुळे सर्वसामान्य शेतक-यांचे प्रचंड हाल होत आहेत. पंचायत समितीमधील जे अधिकारी, कर्मचारी शेतकऱ्यांची लूटमार करत आहेत त्यांना शिवसैनिकांचा दणका दाखवण्याची वेळ आली असल्याने आज दि. 24 जुलै रोजी दुपारी 2.00 वाजताच्या दरम्यान शिवसेना जिल्हाप्रमुख अनिलदादा जगताप पंचायत समिती कार्यालयामध्ये जे अधिकारी आणि कर्मचारी शेतक-यांना वेठीस धरत आहेत त्यांचा समाचार घेण्यासाठी जाणार आहेत. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना पंचायत समिती कार्यालयच्या अधिकारी कर्मचाऱ्यांकडून त्रास होतं आहे त्यांनी आज पंचायत समिती कार्यालयात हजार राहावे असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख अनिलदादा जगताप यांनी केले आहे.

 बीड तालुका पंचायत समितीमध्ये शेतकऱ्यांच्या सिंचन विहिरीसाठी विहिर मंजूर झाल्यानंतर मस्टर काढण्यासाठी फळबाग मस्टर काढण्यासाठी पैशाची मागणी केली जाते. घरकुल कामासाठी व इतर कामे करून देण्यासाठी पैशांची मागणी केली. सर्वसामान्य लोकांची कामे होत नाहीत. या सर्व बाबींचा जवाब विचारण्यासाठी शिवसेचे जिल्हाप्रमुख अनिलदादा जगताप आपल्या पदाधिकारी शिवसैनिकांसह आज स्वतः पंचायत समितीमध्ये जाणार असून अनिलदादा जगताप शेतकऱ्यांची लूटमार करणाऱ्या सर्व अधिकारी व कर्मचारी यांची झाडाझडती घेणार आहेत.

शेतकरी बांधवांनी आवर्जून उपस्थित राहावे- अनिलदादा जगताप

 पंचायत समितीमध्ये ज्या शेतकऱ्यांना आजवर छोट्या मोठ्या कामासाठी त्रास झाला आहे, विनाकारण अधिकारी तथा कर्मचाऱ्यांनी पैशांची मागणी करत काम आडवून ठेवले आहे. अशा सर्व पीडित शेतकरी बांधवांनी आज पंचायत समिती कार्यालयामध्ये उपस्थित राहावे. आज शिवसैनिक तथा शिवसेनेचे सर्व पदाधिकारी आणि जिल्हा प्रमुख अनिलदादा जगताप पंचायत समिती कार्यालयात उपस्थित राहून शेतकरी बांधवांवर अन्याय करणाऱ्या अधिकाऱ्यांचा समाचार घेणार आहेत. त्यामुळे शेतकरी बांधवांनी आवर्जून उपस्थित राहावे असे आवाहन बीड शिवसेनेच्या वतीने अनिलदादा जगताप यांनी केले आहे.

————-

Related Articles

Latest Articles

error: Content is protected !!