मांजरसुंबा येथे बालाघाटाच्या वतीने ना. धनंजय मुंडे यांचे जंगी स्वागत – नारायण शिंदे
नेकनुर दि (प्रतिनिधी )राज्याचे विकासभिमुख नेतृत्व दीन दलितांचे कैवारी शेतकरी शेतमजूरासह अठरापगड जाती जमाती सोबत घेऊन चालणारे सर्व सामान्यांचे नेते ना. धनंजय मुंडे साहेब यांची राज्य मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री म्हणून निवड झाल्याबद्दल ते प्रथमच बीड जिल्ह्य़ात येत असल्याने बालाघाटाच्या जनतेच्या वतीने त्यांचे जंगी स्वागत मांजरसुंबा येथे आयोजित करण्यात आला आहे. तरी संपूर्ण बालाघाटावरील जनतेनी आप आपल्या गावातील प्रलंबित असलेल्या विकासाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी तसेच बालाघाटावरील नेकनुर, चौसाळा, लिबागणेश, पाली जि. प गटातील सर्व राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते व मित्र पक्षाचे सर्व कार्यकर्त्यांनी व ना. धनंजय मुंडे साहेबांवर प्रेम करणाऱ्या जनतेनी दि. १३ जुलै रोजी दुपारी २-०० वाजता मांजरसुंबा येथे होणाऱ्या या जंगी स्वागताच्या कार्यक्रमाला प्रचंड संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष नारायण बाप्पा शिंदे यांनी केले आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजित दादा पवार साहेबांचे विश्र्वासु असलेले राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिनदुबळ्यांचे कैवारी महाराष्ट्राची आन बान शान आदरणीय ना. धनंजय मुंडे साहेब यांची राज्य मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री म्हणून निवड झाल्याबद्दल त्यांचे आगमन बीड जिल्ह्य़ात होत आहे. ना. धनंजय मुंडे साहेबांच्या निर्णयाचे संपूर्ण बीड जिल्ह्य़ात स्वागत करण्यात आले आहे. संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी त्यांच्या बाजुने उभी राहिली आहे म्हणून संपूर्ण बीड जिल्ह्य़ात त्यांचा अभूतपूर्व असा स्वागत होणार आहे आष्टी पासून ते परळी पर्यंत त्यांच्या स्वागताची तयारी साठी जिल्ह्य़ातील नेते व कार्यकर्ते आहोरात्र परिश्रम घेत आहेत. या निमित्ताने बालाघाटावरील जनतेच्या वतीने दि. १३ जुलै रोजी दुपारी २.०० वाजता मांजरसुंबा ता. बीड येथे त्यांचे जंगी स्वागत करण्यात येणार आहे. तरी बालाघाटावरील नेकनुर, चौसाळा, लिंबागणेश, पाली, जि.प गटातील जनतेने आप आपल्या गावातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी तसेच बालाघाटाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मित्र पक्षाचे सर्व कार्यकर्त्यांनी व ना. धनंजय मुंडे साहेबांवर प्रेम करणाऱ्या जनतेनी या जंगी स्वागत समारंभाला प्रचंड संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष नारायण बाप्पा शिंदे यांनी केले आहे.