12.8 C
New York
Monday, May 20, 2024

Buy now

जय हिंद नागरी पतसंस्थेकडून भारत मातेची प्रतिमा देऊन लोक पत्रकार यांचा सन्मान..!

जय हिंद नागरी पतसंस्थेकडून भारत मातेची प्रतिमा देऊन लोक पत्रकार यांचा सन्मान..!

लोकपत्रकारांच्या नियुक्तीने ग्रामीण भागातील भोंदू बाबांना धास्ती – महारुद्र मुंडे

गितांजली लव्हाळे वानखडे वडवणी प्रतिनिधी :-

वडवणी तालुक्यात अल्पावधीतच लोकप्रिय झालेल्या जय हिंद सहकारी पतसंस्था येथे, लोक पत्रकार बाप्पासाहेब भांगे यांची अंधश्रद्धा निर्मूलन समिती तालुका सचिव पदी नियुक्ती झाल्या बद्दल, जय हिंद पतसंस्थेकडून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

वडवणीची कार्यकारणी काही दिवसांपूर्वी , झाली आहे यामध्ये सर्वच या संघटनेमध्ये चाणक्य व्यक्ती पदाधिकारी आहेत. वडवणीच्या कार्यकारणी व टीमचे संपूर्ण बीड जिल्ह्यातून कौतुक होत आहे अशी कामगिरी देखील आहे. यामध्येच बीड जिल्ह्यातील डिजिटल मीडियात आपले नाव असणारे , एक युवा लोक पत्रकार भांगे बप्पासाहेब यांची निवड झाल्याने संपूर्ण तालुक्यात भोंदू बाबांनी धसकी घेतल्याचे चित्र आता पाहायला मिळणार आहे.
पत्रकारितेचा अनुभव व संघटनेत काम केलेले व्यक्ती आपल्या सोबत आल्याने अंधश्रद्धा निर्मूलन समिती टीम आता काम करायला तयार आहे.

पत्रकार भांगे यांच्या निवडीने संपूर्ण तालुक्यातील शुभेच्छांचा वर्षाव होत आहे . वडवनी तालुक्यातील एक निडर व्यक्तिमत्व युवा पत्रकार यांच्याकडे निडर नी पक्षी व्यक्तिमत्त्व म्हणून पाहिले जात.त्यांच्या निवडीने माञ आता भोंदू बाबांनी मात्र या गोष्टीची धासकी घेतली आहे. अस मत महारुद्रा मुंडे यांनी व्यक्त केलं आहे.
यावेळी बहुजन विकास मोर्चाच्या तालुका संघटक महारुद्र मुंडे तर बँकेचे संचालक राठोड साहेब, पांचाळ साहेब व पदाधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Latest Articles

error: Content is protected !!