16.6 C
New York
Saturday, May 24, 2025

Buy now

spot_img
spot_img

तरुणाने मोबाईलवर स्वतःच्या श्रद्धांजलीचा स्टेटस ठेवून आत्महत्या…

तरुणाने मोबाईलवर स्वतःच्या श्रद्धांजलीचा स्टेटस ठेवून आत्महत्या…

बीड प्रतिनिधी – बीड तालुक्यातील अंधापुरी घाट येथील तरूणाने मोबाईलवर स्वतःच्या श्रद्धांजलीचा स्टेटस ठेऊन शेतात बाभळीच्या झाडाला गळफास घेवून आत्महत्या केली आहे. शुभम बाळासाहेब जगताप (वय २०), असे त्याचे नाव आहे.

अंधापुरी गावात ही घटना घडली आहे. गेल्या अनेक दिवसांपासुन शेतीचे वाद चुलत्या सोबत चालु होते आणि त्यांच्या त्रासाला कंटाळून शुभम ने स्वतःच्या मोबाईल वर स्वतः चा फोटो टाकून त्यावर भावपुर्ण श्रध्दांजली लिहून आत्महत्या केल्या असल्याचे शुभम चे मामा शिवाजी घरत यांनी म्हटले आहे. शुभमने केलेल्या आत्महत्येमुळे आईला आणि नातेवाईकाला धक्का बसला आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत.

या धक्कादायक घटनेने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच नेकनुर पोलीस दाखल झाले. पोलिसांनी शवविच्छेदनासाठी मृतदेह नेकनुर कुटीर रुग्णालयात पाठवला. शुभम च्या आत्महत्येचा कुटुंबीय आणि मित्र परिवाराला धक्का बसला आहे.याबाबतचा पुढील तपास नेकनुर पोलिस करत आहेत.

Related Articles

Latest Articles

error: Content is protected !!