जिल्ह्यात राष्ट्रीय योगा दिवस मोठ्या उत्साहात संपन्न..!
- जिल्ह्यात राष्ट्रीय योगा दिवस मोठ्या उत्साहात संपन्न.
- बीड येथे प्रमुख जिल्हा न्यायाधिश,जिल्हाधिकारी,पोलिस अधिक्षक,सीईओंसह नागरीकांचा सहभाग
- ♦️निवासी संपादक-दिपक वाघमारे
- बीड दि,२२: आंतरराष्ट्रीय योगा दिन म्हणुन 21 जून हा दिवस जिल्ह्यात मोठ्या उत्साहात संपन्न झाला. सकाळी यासाठी जिल्ह्यात विविध ठिकाणी योगा प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये सहभागी होत विद्यार्थी, महिला, नागरीक यांच्यासह मान्यवरांनी देखील सहभागी होत योगासने केली.
- बीड मधील जिल्हा न्यायालय परीसरात प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश आनंद यावलकर यांच्या तर चंपावती क्रीडा मंडळ येथे जिल्हाधिकारी दिपा मुधोळ- मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत योग प्रात्यक्षिके करण्यात आली. यावेळी जिल्हा पोलिस अधिक्षक नंदकुमार ठाकूर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार, सहायक जिल्हाधिकारी आदित्य जिवने यांच्यासह अनेक अधिकारी, नागरीक आजच्या उपक्रमात सहभागी झाले. यावेळी जिल्हाधिकारी व मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्ज्वलन करुन योग शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली योग प्रात्यक्षिके करण्यात आली.
- यासह जिल्ह्यातील अंबाजोगाई, शेरी तालुका आष्टी,आवरगाव ता. धारुर यासह विविध ठिकाणी झालेल्या योगदिन कार्यक्रमांना मोठा उत्साह व प्रतिसाद दिसून आला.
- या वर्षी योगा दिवसाची थीम “वसुधैव कुटुंबकम” असून योगा असुन पुर्ण देशात मोठया प्रमाणावर साजरा करण्याचे केंद्र शासनाने आवाहन केले होते. या अनुषंगाने जिल्ह्यात देखील आंतरराष्ट्रीय योग दिवस आयोजन करण्यात आले होते. तर ग्राम विकास मंत्रालय, भारत सरकार यांचे वतीने प्रत्येक गावातल्या शाळेत कार्यक्रम होण्याच्या दृष्टीने याबाबतच्या सुचना देण्यात आल्या आहेत .
- आंतरराष्ट्रीय योगा दिवस शासन व जिल्हा प्रशासनाच्या आवाहनाच्या पार्श्वभूमीवर विविध ठिकाणी योगशिक्षक अथवा क्रीडा शिक्षकांच्या मदतीने गावातील पदाधिकारी यांनी कार्यक्रमाची आखणी करून योग व क्रीडाप्रेमी नागरिक यांनी सहभागाने योग दिन साजरा केला.
error: Content is protected !!