झील कांता इंटरनॅशनल फाउंडेशन च्या वतीने… शालेय साहित्य वाटप…
गितांजली लव्हाळे वानखडे.वडवणी प्रतिनिधी:-
ब्रह्मदत्त विद्यालय मानसिक दिव्यांग मुला मुलींचे प्राधिकरण, निगडी,पुणे या शाळेतील विद्यार्थ्यांना झील कांता इंटरनॅशनल सोशल फाउंडेशन तर्फे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते
श्री.विनोद यादव,श्री.राजेंद्र सगर अध्यक्ष काव्य मित्र संस्था, प्रसिद्ध कवयित्री श्रीमती योगिता कोठेकर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले. शाळेतील विद्यार्थ्यांच्या हस्ते उपस्थित यांचे स्वागत करण्यात आले, विद्यार्थ्यांनी स्वागत गीत सादर केले, शैक्षणिक वर्षाची सुरुवात असल्याने उपस्थित पाहुण्यांनी औक्षण करून गुलाबाच्या पाकळ्यांचा वर्षाव करून उपस्थित विद्यार्थ्यांनचे स्वागत केले. कार्यक्रमाचे मुख्य आयोजन डॉ. प्रमिला तलवाडकर अध्यक्ष झिलकांत फाऊंडेशन यांनी केले होते. शैक्षणिक साहित्यासाठी श्री.सुभाष सांकल उद्योजक जळगाव यांनी देखिल सहकार्य केले.शाळेतील कर्मचारी श्रीमती मालन तिडके, श्रीमती सविता रोडे, दिपाली हराळे यांनी कार्यक्रम नियोजन उत्तमरित्या केले.
ब्रह्मदत्त विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री रवींद्र जोशी यांनी शाळेतील उपक्रम विषयी माहिती देऊन उपस्थित पाहुण्यांचे आभार मानले.शैक्षणिक साहित्य भेट मिळाल्याने सर्व विद्यार्थी आनंदी झाले.