नेकनुर ग्रामसेवक आणि स्त्री रुग्णालय नेकनुर यांची जन्म प्रमाणपत्र देण्यास टाळाटाळ..!
बीड प्रतिनिधी – बीड तालुक्यातील नेकनुर येथील पंचक्रोशी अंतर्गत येणारे स्त्री व कुटीर रुग्णालय नेकनुर येथील कर्मचाऱ्यांकडून जन्म प्रमाणपत्र देण्यास टाळाटाळ. रुग्णालयातील कर्मचारी देतात ग्रामपंचायत चा पत्ता, ग्रामपंचायत देते रुग्णालयाचा पत्ता नेमकं, कुठे मिळतं प्रमाणपत्र हेच कळेना. गट विकास अधिकाऱ्याकडे तक्रार केल्यास गटविकास अधिकाऱ्याने सुमारे दोन ते तीन दिवसांमध्ये सुरळीत चालू होईल असे सांगितले परंतु त्यांच्या आदेशाला सुद्धा ग्रामपंचायतने आणि रुग्णालयाने केराची टोपली दाखवली आहे.
नेकनुर चे ग्रामविकास अधिकारी बहिरवाळ साहेब हे ग्रामपंचायतचे तोंड सुद्धा पाहत नाहीत. आज ग्रामपंचायत आरक्षण सोडत झाली या आरक्षण सोडती ला सुद्धा ग्रामसेवकानी पाठ फिरवली.ग्रामसेवक नेमके कशाला असतात हेच कळेना. जन्म प्रमाणपत्र देणार तरी कोण ? जन्म झाला स्त्री रुग्णालयामध्ये प्रमाणपत्र मिळते ग्रामपंचायत मध्ये.
स्त्री रुग्णालयातील जन्म प्रमाणपत्र देणारे कर्मचारी सांगतात की, आमच्या कडे नोंद होती परंतु आम्ही सर्व नोंदणी असणारे कागदपत्रे व इतर माहिती ग्रामपंचायत कडे दिली आहे. स्त्री रुग्णालय मध्ये थेट सांगण्यात येते की,आम्ही जन्म प्रमाणपत्राचा सर्व डाटा हा ग्रामपंचायत यांच्याकडे दिला आहे. ग्रामपंचायत कर्मचारी आणि ग्रामविकास अधिकारी म्हणतात आमच्याकडे अद्याप पर्यंत माहिती आलेली नाही.
जन्म प्रमाणपत्र कधी मिळणार यावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. मुलांना शाळेमध्ये प्रवेश घेण्यासाठी जन्म प्रमाणपत्राची गरज लागते पण जन्मप्रमाणपत्र नाही मिळाल्यास शाळेत प्रवेश मिळणार का? असे सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
मुलांच्या नुकसानीस स्त्री रुग्णालय नेकनुर व ग्रामविकास अधिकारी जबाबदार राहणार का ? ग्रामसेवकास फोन केल्यास ग्रामसेवकाकडून थेट उडवा उडवीचे उत्तरे देण्यात येतात.आमच्याकडे कोणतेच प्रमाणपत्र मिळत नाही. तुमच्या मुलाचा ज्या ठिकाणी जन्म झाला आहे त्याच ठिकाणी जाऊन प्रमाणपत्र घ्या, मोठ्या आवाजात बोल ना, गटविकास अधिकारी साहेब तुम्ही याच्याकडे लक्ष द्यायला हवे. स्थानिक प्रशासन झोपेचं सोंग घेत आहे, स्थानिक प्रशासनाला सांगितले तर बोलतो,पाहतो अशा प्रकारची उत्तरे येत आहेत. या प्रकरणाकडे कोण लक्ष घालणार यावर सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे..
तरी गटविकास अधिकारी साहेबांनी याकडे वयक्तिक लक्ष घालून नेकनूर परिसरातील नागरिकांची जन्म प्रमाणपत्राची समस्या दूर करावी असे नागरिकांकडून बोलले जात आहे.