माऊली दादांच्या पुण्यतिथी निमित्त श्री क्षेत्र चाकरवाडी मध्ये उसळला जनसागर..!
बीड प्रतिनिधी – विसाव्या शतकातील महान संत विभूती संत श्री ज्ञानेश्वर माऊली महाराज यांची पुण्यतिथी उत्सव मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. हा अखंड हरिनाम सप्ताह ह.भ.प महादेव महाराज तात्या , ह.भ.प नारायण महाराज भाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. रामायणाचार्य ह.भ.प रामरावजी महाराज ढोक यांच्या काल्याच्या कीर्तनाने सप्ताहाची सांगता झाली. लाखो भाविकांनी दादांच्या दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या सकाळपासूनच दादांच्या दर्शनासाठी भाविकांनी हजेरी लावत दादांचे दर्शन घेतले. काल्याचे कीर्तनानंतर महापंगती चे आयोजन करण्यात आले होते लाखो भाविकांनी यावेळी महाप्रसादाचा लाभ घेतला.
चालत असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता काल्याच्या कीर्तनाने दहीहंडी फोडून सांगता करण्यात आली. पहाटेच मंदीरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती. यावेळी नेकनुर पोलीस स्टेशनच्या वतीने मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
गायनाचार्य ओंकार महाराज जगताप, अभिमान महाराज ढाकणे, ज्यांना महाराष्ट्र मृदंग महामेरू म्हणून ओळखतो असे राम महाराज काजळे, अमोल महाराज पवार, नादब्रह्म वारकरी शिक्षण संस्थेचे विद्यार्थी, देवकर बाबा, बिभीषण महाराज कोकाटे तसेच माजी मंत्री जयदत्त अण्णा क्षीरसागर, बीड जिल्ह्याचे आमदार संदीप भैय्या क्षीरसागर, दिलीप अण्णा गोरे, परळीचे आमदार धनंजय मुंडे, धाराशिव जिल्ह्याचे खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास अण्णा घाडगे, नंदकिशोर काका मुंदडा, मनसे चे जिल्हा अध्यक्ष सुमंत धस, पापा मोदी, चाकरवाडी चे सरपंच विनोद कवडे, आदर्श पोलीस पाटील नानासाहेब काकडे, पत्रकार अभिजीत पवार, मराठवाडा नेता चे संपादक, राजकीय मंडळी, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकारी क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी केलेली मंडळी तसेच पंचक्रोशीतील भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.