गुणवंत विद्यार्थ्यांचा 11 जून रोजी आश्रय सेवा केंद्राच्या वतीने सत्कार – शेख आयेशा
वडवणी प्रतिनिधी :-इयत्ता दहावी आणि बारावी वर्गात ज्या विद्यार्थ्यांनी 85 टक्के पेक्षा अधिक गुण घेतलेले आहे अशा सर्व गुणवंत विद्यार्थी विद्यार्थिनींचा मान्यवरांच्या शुभहस्ते सन्मानपत्र, सन्मानचिन्ह देऊन आश्रय सेवा केंद्राच्या वतीने गौरव करण्यात येणार आहे.. या सत्कारास पात्र असलेल्या विद्यार्थ्यांनी, त्यांच्या पालकांनी तात्काळ संपर्क करून नोंद करावी असे आवाहन आश्रय सेवा केंद्राच्या अध्यक्षा शेख आयेशा यांनी केले आहे.
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईचे मराठवाडा विभागीय अध्यक्ष तथा दैनिक समर्थ राजयोगचे संपादक वैभव स्वामी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून 11 जून रोजी इयत्ता दहावी, बारावी तसेच सेट नेट परीक्षेमध्ये जे गुणवंत ठरले आहेत अशा गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या शुभहस्ते सन्मान चिन्ह, सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात येणार आहे. 85 टक्के पेक्षा अधिक गुण असलेल्या विद्यार्थ्यांनी सत्कारासाठी आपली नोंदणी 8 जून पर्यंत मोबाईल नंबर 7030149322 या व्हाट्सअप नंबर वर आपल्या मार्क्स मेमोची झेरॉक्स पाठवून नोंदणी करावी. जे विद्यार्थी सत्कारासाठी नोंदणी करतील त्यांचाच सत्कार 11 जून रोजी करण्यात येईल. तरी सर्व गुणवंत विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना आवाहन करण्यात येते की त्यांनी 8 जून पूर्वी सत्कार स्वीकारण्यासाठी आपल्या नावाची नोंदणी करावी. त्याचबरोबर इलेक्ट्रॉनिक, प्रिंट मीडियातील पत्रकार आणि कर्मचारी यांच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा देखील विशेष बाब म्हणून जिल्हा माहिती अधिकारी बीड यांच्या शुभहस्ते गुणगौरव करण्यात येणार आहे. तेव्हा मीडिया क्षेत्राशी संबंधित गुणवंत विद्यार्थ्यांनी देखील आपल्या नावाची नोंदणी करावी असे आवाहन आश्रय सेवा केंद्राच्या वतीने शेख आयेशा यांनी केले आहे.