24.2 C
New York
Friday, July 18, 2025

Buy now

spot_img
spot_img

डॉ. प्रेमीला तलवाडकर यांना जर्मनी युनिव्हर्सिटीची मानद डॉक्टरेट पदवी प्रदान

डॉ. प्रेमीला तलवाडकर यांना जर्मनी युनिव्हर्सिटीची मानद डॉक्टरेट पदवी प्रदान

गितांजली लव्हाळे वडवणी प्रतिनिधी:-

सामाजिक कार्यकर्त्या डॉ. प्रेमीला तलवाडकर यांना IPU या जर्मनीच्या युनिव्हर्सिटी विद्यापीठा मार्फत शैक्षणिक , सामाजिक सेवा ,क्रीडा , आरोग्य , व्यवस्थापण , साहित्यिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबाद्दल निवड करून मानद पदवी विद्यापीठाकडून दिली जाते . डॉ. प्रेमीला तलवाडकर यांनी केलेल्या सामाजिक सेवेतील उल्लेखनीय कार्याबाद्दल त्यांना सामाजिक क्षेत्रातील मानद डॉक्टरेट पदवी प्रमुख अतिथीच्या हस्ते प्रदान करण्यात आली . या पदवी प्रदानाच्या समयी. विद्यापीठाचे रसिस्टर डॉ. ए.गोपिकांनन, डॉ. रमण त्रिवेदी-उज्जेन मध्यप्रदेश, पी.एच.डी. असोसिएट , प्रो .डॉ रामोई हेनी -डायरेक्टर मीडिया डेव्हलोपमेन्ट कॉन्सिल ऑफ इंडिया न्यू दिल्ली, पी मोहन -नायर डायरेक्टर CTTE केरळ, डॉ. विश्वनाथ मा. प्रिंसिपॉल . कर्नाटक ,डॉ. आर सुरेश बाबू सूचना व प्रसारण मंत्रालय नवी दिल्ली इत्यादी मान्यवरांच्या उपस्थित पदवी प्रदानाचा सोहळा पार पडला . डॉ. प्रेमीला तलवाडकर या गेली १२ वर्ष पेक्षा अधिक कालावधी पासून महिला , अनाथ मुले , पर्यावरण बाबत सामाजिक सेवा देऊन त्यांनी सामाजिक क्षेत्रात बरीच उल्लेखनीय कामे केलेली आहेत . सदर या सन्मानासाठी एकूण ५२९ प्रस्थावमधून केवळ ३१ व्यक्तीची निवड केली गेली आहे . त्या ३१ वक्ती मध्ये . डॉ प्रेमीला तलवाडकर यांच्यी निवड करण्यात आली आहे .

Related Articles

Latest Articles

error: Content is protected !!