24.2 C
New York
Friday, July 18, 2025

Buy now

spot_img
spot_img

चाकरवाडीची किर्ती पुर्ण महाराष्ट्रामध्ये झाली आहे गणेश महाराज चोले यांचे प्रतिपादन..!

चाकरवाडीची किर्ती पुर्ण महाराष्ट्रामध्ये झाली आहे गणेश महाराज चोले यांचे प्रतिपादन..!

बीड प्रतिनिधी – विसाव्या शतकातील महान संत विभूती वै. ह. भ. प. ज्ञानेश्वर माऊली महाराज श्री क्षेत्र चाकर वाडीकर यांच्या कृपा आशीर्वादाने व श्री . ह. भ प तपोनिधी शंतिब्रम्ह महादेव महाराज तात्या यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवर्य तपोनिधी बाळनाथ महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताहाची सातव्या दिवसाचे किर्तन पुष्प श्री.ह. भ. प गणेश महाराज चोले यांचे सुश्राव्य असे सातव्या दिवसाचे किर्तन पुष्प संपन्न झाले.

देवाकडे जाण्यासाठी संतांची गरज लागते. माणसाने जीवनामध्ये नम्रता बाळगली पाहिजे. ज्या माणसाला आपली कीर्ती व्हावी वाटते त्याने टाक्याचे घाव सोसले पाहिजे. दुसऱ्यासाठी जिवन जगणाऱ्याचेच नाव होत. दादांनी आपल्याला दिले ते कोणीही आपल्याला देऊ शकत नाही असे सुध्दा महाराजांनी आपल्या वाणीतून भाविकांना संदेश दिला.

दादांनी स्वप्नात येऊन मला सांगितले राम नामाच भजन कर. राम नामाची खुप ताकत आहे, ती मला माऊली दादांनी दाखवून दिली.राम नामाचा भजनामध्ये खुप ताकत आहे. ज्याच्या संसाराला परमार्थाची जोड आहे त्याचा संसार डगमगत नाही. संतासारखे उपकार कोणीही केले नाहीत. आई वडिलांची सेवा करा, गोमातेची सेवा करा असे महाराजांनी आपल्या वाणीतून भाविकांना मंत्रमुग्ध केले.

हेचि दान देगा देवा । तुझा विसर न व्हावा ।। गुण गाईन आवडी । हेचि माझी सर्व जोडी ।। नलगे मुक्ति धन संपदा । संतसंग देई सदा ।। तुका म्हणे गर्भवासी । सुखे घालावे आम्हासी ।।

हेचि दान देगा देवा । तुझा विसर न व्हावा ।।

एक तर हे की, आम्ही जेव्हा म्हणतो, देवा हेच दान दे की तुझा विसर पडू नये, तेव्हाच आम्ही देवाचे स्मरण करीत असतो, तेव्हाच देवाचे स्मरण झालेले असते. त्या अन्य काळी आम्हाला विसरच पडलेला असतो. हा अभंग म्हणून आमचे देवाचे स्मरण करणेच हे सांगते की, स्मरणाचे काळापर्यंत आम्हाला देवाचे स्मरण नव्हतेच. आता स्मरण करत आहोत. संसाराचेच स्मरणात होतो. देवा आता तुझे स्मरण करत आहोत. पण आता विसर होऊ देऊ नकोस. पण देव कसा विसर पाडेल ? विसर तर संसारामुळे आम्हाला पडतो देवाचा. परंतु तुकोबारायांचे देव असा अविरत स्मरणात आहे की, त्याचे विस्मरणच होऊ नये. ही स्थिती मोडू नये व चुकूनही विसरच न व्हावा यासाठी तुकोबाराय देवाला विनंती करतात. तुकोबा व देव एकरुप झाले आहेत. अविस्मरणीय अशी स्थिती आहे तुकोबांची देवासोबत. जशी आमचे करिता देवाचे स्मरण ही घटना आहे, तशी तुकोबारायांसाठी विस्मरण ही घटना होऊ शकते म्हणून त्या शंकेतून ते देवाला त्याचा विसर न पडण्याचे दान मागतात. आमचे स्मरण म्हणजे वेळोवेळीचे दान मागणे आहे. रोजच विसर आहे व विसर न व्हावा म्हणणे आहे. देवाला त्याचा विसर न पडण्याचे आमचे दान मागणे मोठे विरोधाभासी आहे. गुण गाईन आवडी । हेचि माझी सर्व जोडी ।।

महाराजांनी त्यांच्या गोड वाणीतून भाविक भक्तांना गोड असा संदेश दिला. गोड अश्या अभंगातून भाविक भक्त किर्तन एकूण भारावून गेले. आणि गोड वाणीतून भाविक भक्तांना मंत्रमुग्ध केले.

गायनाचार्य – पिंपळे महाराज, रोडे महाराज, रज्जाक महाराज मृदंगाचार्य – गणेश महाराज भोसले, आविष्कार महाराज क्षीरसागर, प्रशांत महाराज क्षीरसागर, त्रिंबक महाराज शेळके, प्यारेलाल महाराज चव्हाण, नवनाथ महाराज गिरी तलवाडा, अनिकेत महाराज अनवणे तसेच महाराज मंडळी मोठया संख्येने उपस्थित होते.

यावेळी उपस्थित गणेश पवार, डॉक्टर साहेब, बालासाहेब कवडे, पत्रकार अभिजीत पवार, बाबासाहेब मोरे, मंचीक पवार तसेच पंचक्रोशीतील भाविक भक्त तसेच मोठया प्रमाणात ग्रामस्थ मंडळी उपस्थित होते.

Related Articles

Latest Articles

error: Content is protected !!