नेकनुर येथील महा – ई सेवा केंद्रामध्ये सात बारा भेटतेय 800 रुपयाला ?
चक्क सात बारा ( edit ) करून दिली जात आहे.
बीड प्रतिनिधी – नेकनुर मध्ये सात बारा वर चुकीच्या पद्धतीने ऑनलाईन नोंद करून शेतकऱ्यांची महा ई सेवा केंद्र यांच्याकडून लुट केली जात आहे. चक्क 7/12 सोयाबिन च्या जागी कांदा केला जातोय त्या साठी शेतकऱ्यांकडून 800 रुपये घेतले जात आहेत.
संतोष मारोती लोखंडे नामक शेतकर्यांनी ही हकीकत माऊली न्युज शी बोलताना सांगितले आहे.
हुबेहुब दिसणारी फक्त थोडा बदल केला आणि आम्हाला सात बारा दिली आणि 800 रुपये द्या. लागतील असे सेवा केंद्र चालकाने मागणी केली. असे शेतकऱ्याने माऊली न्युज शी बोलताना सांगितले आहे. कांदा अनुदानासाठी सात बारा वर कांदा नोंद लागत आहे. पण, एक दिवस कमी असल्यामुळे महा ई सेवा केंद्र चालकाकडून ( edit ) करून दिली जात आहे 7/12 , त्या साठी शेतकऱ्यांकडून केली जातेय लूट. या सात बारा साठी शेतकऱ्यांकडून 800 रुपये घेतले जात आहेत.
( सविस्तर बातमी लवकरच प्रकाशित केली जाईल ही वाचकांनी नोंद घ्यावी )