7.1 C
New York
Thursday, January 15, 2026

Buy now

spot_img
spot_img

अनेक वर्षांची क्षीरसागरांची सत्ता संपुष्टात; पंडितांच्या नेतृत्वाखाली घडीची ऐतिहासिक बाजी!

  • अनेक वर्षांची क्षीरसागरांची सत्ता संपुष्टात; पंडितांच्या नेतृत्वाखाली घडीची ऐतिहासिक बाजी!
  • बीड | प्रतिनिधी : बीड नगरपालिकेवर अनेक वर्षे वर्चस्व राखणाऱ्या क्षीरसागर बंधूंना यंदाच्या निवडणुकीत मोठा धक्का बसला असून, राजकीय सत्तेची सूत्रे आता पंडितांच्या हातात गेली आहेत. पालकमंत्री अजित पवार आणि पंडितांच्या नेतृत्वाखाली पहिल्यांदाच लढविण्यात आलेल्या बीड नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (घड्याळ चिन्ह) ने निर्णायक विजय मिळवला आहे.
  • अटीतटीच्या झालेल्या या निवडणुकीत प्रेमलता पारवे यांनी तब्बल ३८२७ मतांनी विजय मिळवत नगराध्यक्षपदावर आपले नाव कोरले. या विजयामुळे बीडमध्ये भाजप आणि तुतारी गटाला मोठा राजकीय धक्का मानला जात आहे. निवडणूक निकालाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते. सुरुवातीच्या फेऱ्यांमध्ये भाजपच्या उमेदवाराने आघाडी घेतली होती. मात्र, शेवटच्या निर्णायक टप्प्यात मतदारांनी घडीच्या उमेदवारावर विश्वास टाकत कौल राष्ट्रवादीच्या बाजूने दिला. मतमोजणीच्या अखेरच्या फेऱ्यांमध्ये समीकरणे बदलत गेली आणि अखेर प्रेमलता पारवे यांनी बाजी मारली.
  • विशेष म्हणजे, विजयी ठरलेल्या प्रेमलता पारवे या संपादक शेख मुजीब यांच्या सासू असून, त्यांच्या विजयामुळे बीडच्या राजकारणात नवे पर्व सुरू झाल्याचे चित्र दिसत आहे.
  • या निकालामुळे बीड नगरपालिकेतील राजकीय समीकरणे पूर्णतः बदलली असून, येत्या काळात शहराच्या विकासाच्या दृष्टीने कोणते निर्णय घेतले जातील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Latest Articles

error: Content is protected !!