बीड नगरपरिषदेत अनपेक्षित उलथापालथ; डॉ. ज्योती घुमरे यांना मागे टाकत प्रेमलता ताई पारवे 455 मतांनी आघाडीवर
- बीड नगरपरिषदेत अनपेक्षित उलथापालथ; डॉ. ज्योती घुमरे यांना मागे टाकत प्रेमलता ताई पारवे 455 मतांनी आघाडीवर
- बीड प्रतिनिधी – बीड नगरपरिषद निवडणुकीत सातत्याने बदलणाऱ्या मतमोजणीच्या फेऱ्यांमुळे राजकीय वातावरण तापले असून, आतापर्यंत आघाडीवर असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार डॉ. ज्योती घुमरे यांना मागे टाकत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)च्या उमेदवार प्रेमलता ताई पारवे यांनी सध्या 455 मतांची आघाडी घेतली आहे.
- यापूर्वीच्या फेऱ्यांमध्ये भाजपच्या ज्योती घुमरे आघाडीवर असल्याचे चित्र होते. मात्र, पुढील फेऱ्यांत राष्ट्रवादीच्या मतांमध्ये वाढ झाल्याने समीकरण बदलले असून, निवडणूक अधिकच चुरशीची बनली आहे. तुतारी आणि इतर पक्षांच्या मतवाटपाचा थेट परिणाम या लढतीवर दिसून येत आहे.
- मतमोजणी अजूनही सुरू असून, अंतिम निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आघाडी सतत बदलत असल्याने कोणाच्या गळ्यात विजयाची माळ पडणार, याबाबत सध्या तरी अनिश्चितता कायम आहे.
error: Content is protected !!