सातव्या फेरीत भाजपच्या डॉ. ज्योती घोमरे यांची 8,411 मतांची भक्कम आघाडी
- सातव्या फेरीत भाजपच्या डॉ. ज्योती घोमरे यांची 8,411 मतांची भक्कम आघाडी
- बीड नगरपरिषद निवडणुकीच्या सातव्या फेरीत भारतीय जनता पक्षाच्या डॉ. ज्योती घोमरे यांनी निर्णायक आघाडी घेतली आहे. सातव्या फेरीअखेर त्यांनी 8,411 मतांची आघाडी कायम ठेवत विजयाच्या दिशेने मोठे पाऊल टाकले आहे. सातव्या फेरीतील मतमोजणीनुसार उमेदवारांना मिळालेली मते पुढीलप्रमाणे आहेत—
- कमळ (भाजप) – डॉ. ज्योती घोमरे : 25,244 मते
- घड्याळ – प्रेमलता पारवे : 16,833 मते
- तुतारी – स्मिता वाघमारे : 16,222 मते
- पतंग – शृंगारे सुरेखा : 1,371 मते
- डॉ. ज्योती घोमरे यांच्या आघाडीमुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून शहरात जल्लोष पाहायला मिळत आहे. 14 प्रभागांत कमळ फुलले; बीड नगरपरिषदेवर भाजपचे वर्चस्व, बीड नगरपरिषद निवडणुकीत एकूण 32 प्रभागांपैकी 14 प्रभागांत भाजपचे कमळ फुलले आहे. विविध पक्ष व आघाड्यांचे प्रभागनिहाय संख्याबळ पुढीलप्रमाणे आहे—
- कमळ (भाजप) – 14
- घड्याळ – 09
- तुतारी – 07
- धनुष्यबाण – 01
- मशाल – 01
- एकूण प्रभाग – 32
- या निकालांमुळे बीड नगरपरिषदेवर भाजपचे वर्चस्व स्पष्ट झाले असून, आगामी काळात नगरपरिषदेच्या नेतृत्वासाठी भाजपची भूमिका निर्णायक ठरणार आहे. सातव्या फेरीतील आघाडी आणि प्रभागनिहाय निकाल पाहता शहराच्या राजकारणात भाजपने मजबूत पकड निर्माण केल्याचे चित्र दिसून येत आहे.
error: Content is protected !!