बीड नगरपरिषद निवडणूक : चौथ्या फेरीत डॉ. ज्योती घुमरे 7,574 मतांनी आघाडीवर
बीड नगरपरिषद नीवडणुकीच्या मतमोजणीदरम्यान चौथ्या फेरीअखेर कमळ चिन्हाच्या उमेदवार डॉ. ज्योती घुमरे यांनी 7,574 मतांची भक्कम आघाडी घेतली आहे. आठ प्रभागांमध्ये कमळ चिन्हाचे नगरसेवक आघाडीवर असल्याने शहरात भाजप समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार
कमळ : 07 जागा
घड्याळ : 05 जागा
तुतारी : 03 जागा
मशाल : 01 जागा
अध्यक्षपदाच्या मतमोजणीत कमळच्या उमेदवार डॉ. ज्योती घुमरे यांना आतापर्यंत 15,938 मते मिळाली आहेत. त्यांच्यामागे घड्याळ चिन्हाच्या प्रेमलता पारवे यांना 7,678 मते, तर तुतारी चिन्हाच्या स्मिता वाघमारे यांना 8,364 मते मिळाली आहेत.
मतमोजणीची प्रक्रिया अद्याप सुरू असून पुढील फेऱ्यांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अंतिम निकालाकडे राजकीय वर्तुळासह नागरिकही उत्सुकतेने पाहत आहेत.


