9.7 C
New York
Thursday, November 13, 2025

Buy now

spot_img
spot_img

दहावीच्या परीक्षेचे अर्ज विलंब शुल्कासह भरण्यास १७ नोव्हेंबर पर्यंत मुदतवाढ

  • दहावीच्या परीक्षेचे अर्ज विलंब शुल्कासह भरण्यास १७ नोव्हेंबर पर्यंत मुदतवाढ
  • मुंबई, दि. ११ : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परिक्षेस बसणाऱ्या नियमित विद्यार्थ्यांचे परीक्षेचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने त्यांच्या शाळा प्रमुखांमार्फत भरावयाचे आहेत. विलंब शुल्कासह अर्ज भरण्यास १७ नोव्हेंबर २०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत असल्याचे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत कळविण्यात आले आहे.
  • त्याचप्रमाणे पुनर्परिक्षार्थी, नावनोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी, श्रेणीसुधार योजनेअंतर्गत व तुरळक विषय, आयटीआय (औद्योगिक प्रशिक्षण संस्थेद्वारे ट्रान्सफर ऑफ क्रेडिट घेणारे विद्यार्थी) चे विषय घेऊन प्रविष्ट होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचे परीक्षेचे अर्ज त्यांच्या शाळा प्रमुखांमार्फत प्रचलित पद्धतीने भरावयाची आहेत. हे अर्ज www.mahahsscboard.in या संकेतस्थळावरून ऑनलाईन पद्धतीने भरावयाच्या विलंब शुल्काच्या तारखांना अंतिम मुदतवाढ देण्यात येत आहे. या तारखांना पुन:श्च मुदतवाढ देण्यात येणार नाही, असेही मंडळामार्फत स्पष्ट करण्यात आले आहे.

Related Articles

Latest Articles

error: Content is protected !!