9.7 C
New York
Thursday, November 13, 2025

Buy now

spot_img
spot_img

अहिल्यानगरमधील सोनई घटनेतील आरोपींवर मोक्का लावा — पुणे शहर मातंग समाजाची मागणी

  • अहिल्यानगरमधील सोनई घटनेतील आरोपींवर मोक्का लावा — पुणे शहर मातंग समाजाची मागणी
  • अहिल्यानगरमधील सोनई घटनेतील आरोपींवर तत्काळ सामाजिक द्वेष आणि मोक्का अंतर्गत कारवाई करा अन्यथा राज्यभर मातंग समाज आंदोलन करणार — रमेश बागवे
    पुणे दि. — सोनई (ता. नेवासा, जि. अहमदनगर) येथे मातंग समाजातील युवकावर झालेला हल्ला, त्यानंतर निघालेल्या मोर्चात महिलांविषयी, संपूर्ण मातंग समाज, व समाजातील काही नेत्यांविषयी झालेल्या अत्यंत अर्वाच्च, अपमानास्पद केलेले भाष्य, जीवे मारण्याची उघडपणे दिलेली धमकी आणि समाजात द्वेष पसरविणाऱ्या घटनेच्या पार्श्वभूमीवर, पुणे शहर जिल्हा मातंग समाज यांच्या वतीने सोनई पोलीस स्टेशनला भेट देऊन सदरील आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्याची मागणी मातंग समाजाच्या वतीने करण्यात आली .
  • सोनई मधील आरोपींवर सामाजिक द्वेष पसरवणे तसेच मोक्का ची कठोर कारवाई पोलीस प्रशासनाने करावी अन्यथा मातंग समाज राज्यभर आंदोलन करणार आहे असा इशारा मातंग एकता आंदोलनाचे संस्थापक व माजी गृह राज्यमंत्री रमेश बागवे यांनी दिला आहे .
    यावेळी मातंग समाजाच्या शिष्टमंडळाने घटनेविषयीचा लेखी पुरवणी जबाब (Supplementary Statement) सादर केला असून, संबंधित शेवगाव विभागाचे डीवायएसपी नीरज राजगुरू, व तपास अधिकारी विजय माळी, यांच्यासोबत सविस्तर चर्चा केली.
  • डीवायएसपी यांनी या प्रकरणातील सर्व पुरावे, तक्रारीतील व्हिडिओ व माहिती पाहून लवकरात लवकर हा पुरवणी जबाब न्यायालयात सादर करून संबंधित कलमे वाढविण्याचे आश्वासन दिले आहे.
    या प्रकरणात केवळ जातीय अपमान नाही, तर समाजात भीती, द्वेष आणि अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न झाल्यामुळे, यामध्ये जिवे मारण्याच्या धमक्या, तसेच संगठित गुन्हेगारीचे स्वरूप असल्यामुळे मोक्का (अंतर्गत) कलमे लागू करण्याची मागणी करण्यात आली आहे.
    आमच्याकडे घटनेचे सर्व व्हिडिओ, छायाचित्रे व पुरावे सुरक्षित ठेवलेले असून, राज्यातील विविध पोलिस ठाण्यांमध्ये या प्रकारची एफ.आय.आर. दाखल करण्यासाठी सामाजिक आवाहन करण्यात येणार आहे.
    पुणे शहर जिल्हा मातंग समाज चे शिष्टमंडळाचे नेतृत्व मातंग एकता आंदोलनाचे संस्थापक व माजी गृहराज्यमंत्री रमेशदादा बागवे यांनी केले, त्यांच्या समावेत अनिल हातागळे, दीपक कसबे, मा. नगरसेवक अविनाश बागवे, दलित युवक आंदोलनाचे संस्थापक सचिन बगाडे, दलित महासंघाच्या लक्ष्मीताई पवार, अँड. राजश्री अडसूळ, शंकर तडाखे, मनोजआप्पा शिरसागर, रवी पाटोळे, अँड महेश सकट, निलेश वाघमारे, दयानंद अडागळे , न्यानेश्वर राक्षे, विठ्ठल थोरात, अरुण गायकवाड, विनोद वैरागेर, विकास सातारकर, रवी आरडे, व इतर प्रमुख नेते व कार्यकर्त्यांचा सहभाग होता.
  • पुणे शहर जिल्हा मातंग समाज या प्रकरणात समाजासोबत ठामपणे उभा असून, न्याय मिळेपर्यंत हा संघर्ष सुरू राहील.
    हा लढा केवळ एका समाजाचा नाही, तर न्याय, सन्मान आणि संविधानिक अधिकारांचा आहे. अशी भूमिका पुणे शहर जिल्हा मातंग समाजाच्या वतीने व्यक्त करण्यात आली.

  • मा. रमेशदादा_बागवे
    मा. गृहराज्यमंत्री, महाराष्ट्र राज्य
    ──────✧❁✧──────
    अविनाश_रमेशदादा_बागवे
    नगरसेवक, पुणे मनपा
    कार्याध्यक्ष, मातंग एकता आंदोलन, महाराष्ट्र राज्य

Related Articles

Latest Articles

error: Content is protected !!