बीडच्या पालीतील कॅनरा बँक फोडली! साडेअठरा लाखांची रोकड लंपास
- बीडच्या पालीतील कॅनरा बँक फोडली! साडेअठरा लाखांची रोकड लंपास
- बीड प्रतिनिधी – बीड तालुक्यातील पाली येथे गुरुवारी पहाटे चोरट्यांनी कॅनरा बँकेत धाडसी चोरी केली. या घटनेत जवळपास अठरा लाख रुपयांची रोकड चोरट्यांनी लंपास केली.मिळालेल्या माहितीनुसार, चोरट्यांनी पहाटेच्या सुमारास बँकेच्या मागील बाजूची भिंत फोडून आत प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी गॅस कटरच्या सहाय्याने लॉकर तोडून रोकड काढून नेली. घटनेची माहिती मिळताच बीड ग्रामीण पोलीस ठाण्याचे अधिकारी तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी चोरट्यांनी वापरलेली साधने व पावलांचे ठसे, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू केले आहे.

error: Content is protected !!