7.6 C
New York
Tuesday, October 28, 2025

Buy now

spot_img
spot_img
  • “पत्रकारितेचा अभिमान, सत्य शब्दांचा मान ; अभिजित पवारांना राज्यस्तरीय सन्मान”
  • संपादक अभिजीत पवार यांना सरपंच सेवा संघाचा आदर्श पत्रकार पुरस्कार जाहीर..
  • बीड प्रतिनिधी – सरपंच संघाच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय “स्वराज्य सरपंच सेवा संघ सन्मान सोहळा २०२५” या कार्यक्रमात दै. बीड माऊलीचे मुख्य संपादक अभिजित रामेश्वर पवार यांना “आदर्श पत्रकारिता सन्मान २०२५” या राज्यस्तरीय पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.हा पुरस्कार वितरण सोहळा गुरूवार, दि. ३० ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ११.०० वाजता माऊली संकुल सभागृह, सावेडी रोड, अहिल्यानगर येथे संपन्न होणार आहे.
  • या सोहळ्यास सरपंच सेवा संघाचे समर्थक बाबासाहेब पावसे पाटील यांच्या नेतृत्वाखाली तसेच शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे साहेब, कालभक्त श्रीमहंत डॉ. श्रीकांतदास धुमाळ महाराज उज्जैन, ग्रामसेवक नेते एकनाथराव ढाकणे साहेब, यादवराव पावसे पाटील आणि रोहित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध क्षेत्रातील मान्यवर सहभागी होणार आहेत.दै. बीड माऊलीचे मुख्य संपादक अभिजित पवार यांनी अल्पावधीतच आपल्या निर्भीड वृत्तांकन, जनतेच्या समस्या अग्रक्रमाने मांडण्याची शैली आणि सामाजिक उत्तरदायित्व जपत पत्रकारितेच्या क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या या कार्याची दखल राज्यस्तरावर घेण्यात आली असून, हा पुरस्कार त्यांच्या पत्रकारितेतील निष्ठा आणि परिश्रमाचे प्रतीक मानला जात आहे.
  • या राज्यस्तरीय सन्मानामुळे पत्रकारिता क्षेत्रातील अभिजित पवार यांच्या कार्याची दखल घेण्यात आली असून, बीड जिल्ह्यासाठी हा अभिमानाचा क्षण ठरला आहे.राज्यभरातून पत्रकार बांधव, सामाजिक कार्यकर्ते आणि सरपंच संघाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असून, हा सोहळा एक प्रेरणादायी आणि गौरवशाली क्षण ठरणार आहे.

Related Articles

Latest Articles

error: Content is protected !!