15.2 C
New York
Friday, October 24, 2025

Buy now

spot_img
spot_img

डॉ. महिलेने संपवलं आयुष्य

  • डॉ. महिलेने संपवलं आयुष्य
  • माऊली न्युज मिडियाच्या हाती लागलेल्या त्या पत्रात खळबळजनक माहिती..
  • सातारा जिल्ह्यातील फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयात महिला डॉक्टरवर आत्महत्या केल्याच्या घटनेने राज्यात एकच खळबळ उडाली आहे. फलटणचा PSI गोपाल बदने याने चार वेळा बलात्कार केल्याचा उल्लेख या महिला डॉक्टरने आपल्या हातावर लिहिले आहेत. या घटनेमुळे पोलिस दलावर मोठे प्रश्न चिन्ह उपस्थित होत आहे.
  • अशातचा आता या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत या महिला डॉक्टरने पोलीस उपाधीक्षकांना लिहिलेले पत्र “माऊली न्युज मिडिया”च्या हाती लागले आहे. या पत्रात डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे की, “पेशंट फिट आहे’ असा अहवाल मिळावा, यासाठी दबाव निर्माण केला जात होता. डॉक्टर यांनी ही तक्रार प्रथम पोलीस निरीक्षक महाडिक यांच्याकडे केली होती, मात्र त्यांच्याकडून उडवा-उडवीची उत्तरे मिळाल्याचे डॉक्टरांनी पत्रात नमूद केले आहे. पत्रात तीन पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नावे देखील नमूद आहेत.डॉ मुंडे यांनी हे पत्र १९जून रोजी लिहले आहे.
  • मागील वर्षभरापासून तिच्यावर राजकीय तसेच पोलिसांकडून दबाव टाकला जात होता. चुकीचे आणि खोटे पोर्स्टमाटम रिपोर्ट बनवण्यासाठी तिच्यावर दबाव टाकण्यात येत होता. हे नवीन पत्र बाहेर आल्याने पोलिस दबाव टाकत असल्याचे दिसून येत आहे. महिला डॉक्टरने या पत्रामध्ये पोलिस उपनिरीक्षक पाटील, जायपत्रे, तसेच गोपाल बदने या तिघांचा उल्लेख करण्यात आला आहे.

Related Articles

Latest Articles

error: Content is protected !!