19.5 C
New York
Sunday, October 19, 2025

Buy now

spot_img
spot_img

दहावी, बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर…

  • दहावी, बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर…
  • कधी सुरू होणार परीक्षा?
  • पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (राज्य मंडळ) दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार बारावीची परीक्षा १० फेब्रुवारीपासून, तर दहावीची परीक्षा २० फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे.
  • राज्य मंडळाचे सहसचिव प्रमोद गोफणे यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. राज्य मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत इयत्ता बारावी, दहावीची लेखी, प्रात्यक्षिक व इतर परीक्षा घेण्यात येतात. त्यानुसार बारावीची लेखी परीक्षा १० फेब्रुवारी ते १८ मार्च या कालावधीत घेतली जाणार आहे. तसेच प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी, अंतर्गत मूल्यमापन परीक्षा २३ जानेवारी ते ९ फेब्रुवारी या कालावधीत होणार आहे.
  • त्यात माहिती तंत्रज्ञान, सामान्य ज्ञान या विषयांच्या प्रात्यक्षिक परीक्षांचाही समावेश आहे. तर २० फेब्रुवारी ते १८ मार्च या कालावधीत दहावीची लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी, अंतर्गत मूल्यमापन परीक्षा २ फेब्रुवारी ते १८ फेब्रुवारी या कालावधीत होणार आहे. शरीरशास्त्र, आरोग्यशास्त्र, गृहशास्त्र या विषयांच्या प्रात्यक्षिक परीक्षांचाही त्यात समावेश आहे.

Related Articles

Latest Articles

error: Content is protected !!