फळरोप वाटिका मजुरांचे जिल्हा अधिकक्षक कृषी अधिकारी कार्यालया समोर आमरण उपोषण सुरू
- फळरोप वाटिका मजुरांचे जिल्हा अधिकक्षक कृषी अधिकारी कार्यालया समोर आमरण उपोषण सुरू
- माजलगाव प्रतिनिधी – कृषि अधिकारी कृषि चिकित्सालय फळरोप वाटिका व तालुका बीजगुणन केंद्र येथील दैनंदिन रोजंदारी मंजूरी माहे ऑगस्ट २०२२ ते फेब्रुवारी २०२३ या कालावधीत थकीत मजूरी आज पर्यंत मिळालेली नसल्याने तसेच माहे जून २०२४ ते ऑक्टोंबर २०२४ पर्यंत मजूरी सुध्दा आजतागायत मिळालेली नसल्याने फळरोप वाटिका मजुरांनी काल दि ऑक्टोबर पासून जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी बीड यांच्या कार्यालया समोर आमरण उपोषण सुरू केले आहे
- सदरील उपोषण कर्त्यांचे म्हणणे आहे की , आम्ही घरामध्ये कर्ता असल्याने कूटूंबाची सर्वस्वी जवाबदारी आमच्यावर आहे. उदा. मुलाबाळाचे शिक्षण, आई-वडिल वयस्कर असल्याने त्यांना वेळोवेळी दवाखाना व औषधी उपचाराची आवश्यकत्ता असते घरामध्ये आडी- आडचणीचा सामना करणे. जिक्रीचे झाले असून आमच्यावर उपाषमारीची वेळ आलेली आहे. तरी विनंती की आमच्या हक्काचे वेतन मिळवून द्यावे
- या पुर्वी मा. कृषि आयुक्तालय पुणे व मा. विभागीय कृषि सहसंचालक संभाजीनगर, मा. जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी बीड, मा. उपविभागीय कृषि अधिकारी माजलगांव तोंडी व लेखी कळवूनही त्यांनी आजतागायत आमच्या थकीत वेतनाबाबत. दखल घेतलेली नाही. त्या मुळे आम्ही गणेश थोरात ,तुंकाराम निसर्गध व मंहानदाबाई नवले आदींनी आजपासून हे उपोषण सुरू केले आहे
error: Content is protected !!