नवरा बायकोच्या भांडणात चार महिन्याच्या चिमुकल्याची काय चूक..
- नवरा बायकोच्या भांडणात चार महिन्याच्या चिमुकल्याची काय चूक..
- मुलाला पाण्याच्या बॅरेल मध्ये टाकून वडीलांनी घेतला गळफास
- बीड प्रतिनिधी – गेवराई तालुक्यातील तलवाडा तहत रामनगर येथे अगोदर चार महिन्याच्या मुलाला पाण्याच्या बॅरेल मध्ये टाकून वडीलांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

- गेवराई तालुक्यातील तलवाडा तहत रामनगर येथील अमोल हौसराव सोनवणे व पायल अमोल सोनवणे या दांपत्याने चार दिवसापूर्वी घरगुती कारणावरून विषारी औषध प्रशासन केले होते. उपचारानंतर २/१०/२०२५ रोजी दसऱ्याच्या दिवशी ते घरी परतले. ३ रोजी पहाटे चार वाजताच्या दरम्यान अमोल हौसराव सोनवणे वय वर्ष ३० यांनी आपल्या पोटाच्या चार महिन्याच्या मुलाला पाण्याच्या बॅरेल मध्ये टाकले त्यानंतर स्वतःच्या घरात गळफास घेतला. अमोल सोनवणे सह चार महिन्याच्या बाळाचे तलवाडा प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करण्यात आले आहे. नवरा बायकोच्या भांडणात या चार महिन्याच्या चिमुकल्याची काय चूक होती असा प्रश्न उपस्थित होत आहे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
error: Content is protected !!