सारथी’ वसतिगृहे योजना प्रभावीपणे राबवा.. डॉ.ज्योतीताई मेटे
- सारथी’ वसतिगृहे योजना प्रभावीपणे राबवा.. डॉ.ज्योतीताई मेटे
- बीड (वार्ताहर): – मराठा, कुणबी आणि कुणबी मराठा समाजातील विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणाच्या सोयीसाठी प्रत्येक जिल्ह्यात एक वसतिगृह सुरू करण्यात यावे अशी मागणी शिवसंग्रामच्या अध्यक्ष डॉ.ज्योतीताई विनायकराव मेटे यांनी मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष मा.ना.श्री.राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
- मराठा, कुणबी आणि कुणबी मराठा समाजातील विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणाच्या सोयीसाठी प्रत्येक जिल्ह्यात एक वसतिगृह सुरू करण्याच्या प्रस्तावाला गती मिळालेली नाही. पुणे जिल्हा वगळता इतर कोणत्याही जिल्ह्यात खासगी संस्थांमार्फत ही वसतिगृहे सुरू होऊ शकली नाहीत. खासगी संस्थांनी स्वारस्य न दाखवल्यामुळे ही योजना रखडली आहे.या गंभीर समस्येवर तातडीने तोडगा काढण्यासाठी शिवसंग्रामच्या अध्यक्ष डॉ.ज्योतीताई विनायकराव मेटे यांनी मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष मा.ना.श्री.राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे काल एका निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
- डॉ.ज्योतीताई मेटे यांची आग्रही मागणी..
- डॉ. ज्योतीताई मेटे यांनी निवेदनात स्पष्ट केले आहे की, खासगी संस्थांमार्फत वसतिगृहे सुरू करणे शक्य होत नसल्यास, सरकारने ‘छत्रपती शिवाजी महाराज सारथी जिल्हास्तरीय वसतिगृहे योजना’ अधिक प्रभावीपणे राबवून तातडीने ही वसतिगृहे सुरू करावीत. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हितासाठी हा निर्णय त्वरित घेणे आवश्यक आहे.
- आजच्या बैठकीत निर्णयाची अपेक्षा ….
- डॉ.ज्योतीताई मेटे यांनी केलेल्या या महत्त्वपूर्ण पाठपुराव्यामुळे, मराठा समाजाच्या प्रश्नांवर निर्णय घेण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत हा विषय चर्चेला येणार आहे.आज,बुधवार, दि. 01 ऑक्टोबर रोजी सकाळी 10.00 वाजता सह्याद्री अतिथीगृह, मलबार हिल, मुंबई येथे होणाऱ्या या महत्त्वाच्या बैठकीत डॉ. ज्योतीताई मेटे यांना विशेष आमंत्रित करण्यात आलेले असून विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी हा प्रश्न मार्गी लागणे अत्यंत आवश्यक आहे आणि वसतिगृहांशी संबंधित हा प्रश्न नक्कीच मार्गी लागेल,अशी प्रबळ आशा आहे असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले आहे.
error: Content is protected !!