पूरग्रस्तांच्या विद्यार्थ्यांचे १००% शुल्क माफ करावे; ज्योतीताईं मेटेचे मुख्यमंत्र्यांना साकडे.
- पूरग्रस्तांच्या विद्यार्थ्यांचे १००% शुल्क माफ करावे; ज्योतीताईं मेटेचे मुख्यमंत्र्यांना साकडे.
- पूरग्रस्त विद्यार्थ्यांच्या चालू वर्षाच्या 100 % शैक्षणिक शुल्क माफीची ज्योतीताईकडून मुख्यमंत्र्यांकडे मागणी..
- शालेय, वैद्यकीय आणि उच्च तंत्र शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांना मोठा दिलासा देण्यासाठी त्वरित निर्णय घेण्याची पत्राद्वारे केली विनंती.
- बीड (वार्ताहर) राज्यातील पूरग्रस्त भागांमध्ये झालेल्या अतोनात नुकसानीमुळे अनेक कुटुंबे मोठ्या आर्थिक संकटात सापडली आहेत. घरे, मालमत्ता आणि उपजीविकेची साधने नष्ट झाल्याने पालकांना आपल्या मुलांचे चालू शैक्षणिक शुल्क भरणे अत्यंत कठीण झाले आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडण्याची भीती निर्माण झाली आहे.या पार्श्वभूमीवर, पूरग्रस्त भागातील शालेय शिक्षण, वैद्यकीय शिक्षण आणि उच्च तंत्र शिक्षण घेत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे चालू शैक्षणिक वर्षाचे 100% शैक्षणिक शुल्क माफ करण्याची मागणी शिवसंग्रामच्या अध्यक्ष डॉ. ज्योती मेटे यांनी मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री, शालेय शिक्षण मंत्री, वैद्यकीय शिक्षण मंत्री आणि उच्च तंत्र शिक्षण मंत्र्यांना पत्राद्वारे केली आहे.
- पूरग्रस्त भागातील सर्व पात्र विद्यार्थ्यांचे चालू शैक्षणिक वर्षाचे 100% शैक्षणिक शुल्क त्वरित माफ करावे तसेच शुल्क माफीचा लाभ देण्यासाठी व पात्र पूरग्रस्त विद्यार्थ्यांची ओळख पटवण्यासाठी शासनाने त्वरित योग्य निकष आणि कार्यप्रणाली निश्चित करावी.हा निर्णय पूरग्रस्त कुटुंबांना मोठा दिलासा देणारा ठरेल आणि एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाही याची खात्री मिळेल,” असे पत्रात नमूद करण्यात आले आहे.
error: Content is protected !!