शिवसंग्राम धावली शेतकऱ्यांच्या मदतीला
- शिवसंग्राम धावली शेतकऱ्यांच्या मदतीला
- बीड, माजलगाव, केज येथील गावांना भेट देत शेतकऱ्यांची व्यथा प्रशासनापर्यंत पोहोचवली
- नदीपात्र क्षेत्रातील शेती वाहून गेलेल्या शेतकऱ्यांसाठी उपाय योजना करणे गरजेचे – प्रभाकर कोलंगडे
- बीड (प्रतिनिधी) परतीच्या पावसात जगलेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील सोयाबीन, मका, कापूस, उडीद, तूर, मूग पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच घरे, शेती आणि जनावरांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. ज्यांच्या जमिनी नदीकाठी आहेत ते शेतकरी अधिक प्रभावित झाले आहेत. ज्यांची जमीन खरडून गेली आहे. त्यांच्यासाठी प्राधान्याने उपाय योजना करणे गरजेचे आहे. असे मत शिवसंग्राम चे प्रदेश उपाध्यक्ष प्रभाकर कोलंगडे यांनी बीड, केज आणि माजलगाव तालुक्यात झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे नुकसान झालेल्या भागाच्या पाहणी दरम्यान व्यक्त केले.
- महापूरामुळे झालेल्या मालमत्तेचे व शेतीच्या नुकसानीचे वस्तुनिष्ठ अहवाल सादर करून नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू. या नैसर्गिक संकटाचा सामना सरकार, प्रशासन व नागरिक यांच्या समन्वयाने अधिक व्यवस्थितपणे करता येईल.बीड, केज आणि माजलगाव तालुक्यात झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे नुकसान झालेल्या भागाची शिवसंग्राम प्रदेश उपाध्यक्ष प्रभाकर कोलंगडे यांनी दी. २३ मंगळावर रोजी पाहणी केली. यावेळी त्यांनी नागरिकांशी संवाद साधताना बोलत होते. यावेळी प्रांताधिकारी, तहसीलदा कृषी अधिकारी, मंडळ अधिकारी , तलाठी , ग्रामसेवक यांच्याशी समन्वय साधत शेतकऱ्यांच्या समस्या प्रशासना पर्यंत पोहचवल्या यावेळी नागरिकांनी खचून न जाता झालेल्या नुकसानीची माहिती प्रशासनाला द्यावी लोकनेते विनायकराव मेटे साहेब यांच्या शिकवणी नुसार आणि शिवसंग्राम अध्यक्ष डॉ ज्योतीताई मेटे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर उभे आहोत अशा शब्दात प्रभाकर कोलंगडे यांनी पूरग्रस्तांना धीर दिला.या प्रसंगी शिवसंग्राम जिल्हा सरचिटणीस अनिल घुमरे , युवक जिल्हाध्यक्ष सुनील कुटे , शिवसंग्राम माजलगाव तालुकाध्यक्ष उत्तम पवार , बाळासाहेब गलांडे, लिंबराज वाघ,रामेश्वर गवळी , उपाध्यक्ष आबा नाईकवाडे , ग्रामपंचायत सदस्य प्रल्हाद काळे , गिरी महाराज देवगावचे सरपंच दत्तात्रय कोकाटे, उपसरपंच दत्तात्रय काळे, माजी चेअरमन नितीन काळे , शुभम भोसले , बाबुराव काळे , जयराम राऊत , भागवत काळे ,ग्रामसेवक राऊत साहेब , तलाठी ,कृषी अधिकारी तसेच परिसरातील शेतकरी गावकरी पंचक्रोशीतील नागरिक उपस्थित होते
error: Content is protected !!