26.8 C
New York
Tuesday, August 12, 2025

Buy now

spot_img
spot_img

श्री क्षेत्र चाकरवाडी म्हणजे परमार्थाचे उभे पीक बालाजी महाराज बोराडे यांचे प्रतिपादन..

  • श्री क्षेत्र चाकरवाडी म्हणजे परमार्थाचे उभे पीक बालाजी महाराज बोराडे यांचे प्रतिपादन..
  • बीड जिल्हा संतांची भूमी म्हणुन ओळखली जाते 
  • बीड प्रतिनिधी – श्री क्षेत्र चाकरवाडी मध्ये भजन केलं तर पुण्य भेटते. जुने माणसे खूप भाग्यवान असतात. परमार्थाचे उभे पिक हे चाकरवाडी मध्ये आहे. महाराष्ट्रातील नव्हे तर जगातील एकमेव ठिकाण २४ तास अन्नदान सेवा सुरू आहे ते म्हणजे श्री क्षेत्र चाकरवाडी आहे. प्रति वर्षाप्रमाणे विसाव्या शतकातील महान संत विभूती संत श्री ज्ञानेश्वर माऊली महाराज यांच्या आशीर्वादाने आणि ह. भ. प महादेव महाराज तात्या यांच्या मार्गदर्शनाखाली चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह व बाळनाथ महाराज यांचा पालखी सोहळ्यातील तिसऱ्या दिवसाची कीर्तन सेवा ह. भ. प बालाजी महाराज बोराडे यांची संपन्न झाली.
  • जगामध्ये सर्वोत्तम सेवा कोणती असेल तर ती संत सेवा आहे त्या साठी संतांची सेवा करा तुम्हाला कोणत्याच गोष्टीची कमी पडणार नाही. दादा माऊली यांच्या आशीर्वादाने कोणत्याच गोष्टीची कमतरता पडणार नाही. दादा माऊली यांची तुम्ही सेवा करा असा भाविकांना महाराजांनी संदेश दिला.
  • देवाला जर कोणती सेवा आवडत असेल तर ती संत सेवा आहे. जगाच्या पाठीवर उत्तम सेवा कोणती असेल तर ती संत सेवाच आहे. चांगले माणूस बघायचे असेल तर श्री क्षेत्र चाकरवाडी मध्ये आहे. चांगलं माणूस बनायचं असेल तर ते संप्रदाय आहे. आणि जर परमआनंद कोठे असेल तर तो पण या वारकरी संप्रदायामध्ये आहे. जे माणसे देव, द्वेष, समाजासाठी, देशासाठी जगतात ते अजरामर असतात. पण जे स्वतःच्या स्वार्थासाठी जगतात ते अजरामर राहत नाहीत. चाकरवाडी मध्ये भजन केलं तर पुण्य भेटते.जगात भारतासारखी संस्कृती नाही जगामध्ये संस्कृती च्या बाबती मध्ये ओळखला जाणारा देश म्हणजे भारत देश आहे. सूर्य उगवल्या बरोबर पहिल किरण टाकणारा देश हा भारत देश आहे. महाराष्ट्राला संतभूमी म्हणून ओळखले जाते. परमार्थ मध्ये जात, धर्म, पंत नाही या परमार्थांमध्ये सगळ्यांना सारखे मानले जाते ते एकमेव ठिकाण आहे म्हणजे परमार्थ आहे.
  • महाराजांनी सांगितले की माझे पूर्वी जन्मीचे पुण्य आहे म्हणून मला या ठिकाणी सेवा करण्याचे पुण्य लाभले आहे. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे सगळे तीर्थ जर एक ठिकाणी पाहायचे असेल तर ते श्री गुरु यांच्या चरणी पहावे. सगळीकडे भगवान परमात्मा आहे असे एकही ठिकाण सापडणार नाही त्या ठिकाणी भगवान परमात्मा नाही. जर पूजा कोणाची करायची असेल तर श्री गुरु यांची पूजा करा. जगामध्ये उत्तम लाभ होण्याचे ठिकाण म्हणजे संत होय. संताना बघितले तरही लाभ होतो, नमचिंतन, चरण जवळ बसून राहिले तरही लाभ होतो.
  • यावेळी गायनाचार्य दत्ता महाराज चव्हाण, रेवण महाराज महादेव महाराज रोडे, पिंपळे महाराज , माखले महाराज, हनुमंत महाराज घोलप मृदंगाचार्य अमोल महाराज पवार, आविष्कार महाराज क्षीरसागर तसेच त्रिंबक महाराज शेळके, अनिकेत महाराज अनवाने, प्रशांत महाराज क्षीरसागर, श्री क्षेत्र चाकरवाडी चे पोलीस पाटील नानासाहेब काकडे, आदर्श शिक्षक परमेश्वर भोसले सर, पत्रकार अभिजीत पवार, ज्ञानोबा अनवणे, मंचिक पवार, ग्रामसेवक सुरवसे साहेब, तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते

Related Articles

Latest Articles

error: Content is protected !!