युवासेनेतर्फे मोफत छत्रीचे वाटप; बाजीराव चव्हाण यांच्या पुढाकाराने यशस्वी उपक्रम.
- युवासेनेतर्फे मोफत छत्रीचे वाटप; बाजीराव चव्हाण यांच्या पुढाकाराने यशस्वी उपक्रम.
- युवासेना मराठवाडा निरीक्षक बाजीराव चव्हाण यांच्या संकल्पनेतून शालेय विद्यार्थी, स्थानिक नागरिक यांना पावसाळ्यात उपयोगी ठरणाऱ्या छत्र्यांचे मोफत वाटप.

- बीड प्रतिनिधी : राज्याचे संवेदनशील उपमुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे साहेब, युवासेना मार्गदर्शक खासदार डॉ. श्रीकांत शिंदे साहेब आणि युवासेना कार्याध्यक्ष मा. पुर्वेशजी सरनाईक साहेब यांच्या सक्षम नेतृत्वाखाली, युवासेना मराठवाडा निरीक्षक बाजीराव चव्हाण यांच्या संकल्पनेतून आणि पुढाकाराने इमामपूर येथे मोफत छत्री वाटपाचा उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमांतर्गत शालेय विद्यार्थी तसेच स्थानिक नागरिकांना पावसाळ्यात उपयोगी ठरणाऱ्या छत्र्यांचे मोफत वाटप करण्यात आले. ग्रामीण भागातील नागरिकांच्या गरजा ओळखून, सामाजिक भान जपत बाजीराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली हा स्तुत्य उपक्रम यशस्वीपणे पार पाडला. गावकऱ्यांनी या स्तुत्य उपक्रमाचे मनापासून स्वागत केले आणि युवासेनेचे आणि बाजीराव दादा चव्हाण यांचे मनापासून आभार मानले.
कार्यक्रमास गावातील सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी युवासेनेचे प्रमुख पदाधिकारी, तसेच धर्मवीर प्रतिष्ठानचे सर्व सहकारी, ग्रामपंचायत सदस्य, स्थानिक जि. प. प्रा. शाळेतील विद्यार्थी, शिक्षकवृंद, पालक, व वरिष्ठ अनेक मान्यवर उपस्थित होते.
error: Content is protected !!