मांजरसुंबा-नेकनूर दरम्यान महामंडळाच्या एसटी बसचे दोन चाकं पडले निखळुन.
- मांजरसुंबा-नेकनूर दरम्यान महामंडळाच्या एसटी बसचे दोन चाकं पडले निखळुन.
- – चालकाच्या प्रसंगावधानामुळे 70 प्रवाशांचे बचावले जीव.
- अशोक शिंदे नेकनूर: छत्रपती संभाजीनगर-लातूर ही महामंडळाची बस आज दुपारी लातूरच्या दिशेने जात होती. बीड तालुक्यातील मांजरसुंबा आणि नेकनूरच्या दरम्यान पोहोचली असता अचानक मागच्या बाजूचे दोन टायर निखळून पडले एक टायर पूर्वेला तर दुसरे पश्चिमेला निघून पडले. मांजरसुंबा-नेकनूर दरम्यान छत्रपती संभाजी नगर लातूर mh 24 au 8335 या महामंडळाच्या एसटी बसचे दोन चाकं पडले निखळुन पडले लातूर डेपोचे भंडेराव सदाशिव चिवरे या चालकाच्या प्रसंगावधानामुळे 70 प्रवाशांचे बचावले.
- यादरम्यान मोठा अपघात झाला असता मात्र चालकाने प्रसंगावधान राखत बस नियंत्रणात आणत थांबवली. टायर निखळून पडले त्यावेळेला बस मधून 70 प्रवासी प्रवास करत होते. त्यानंतर प्रवाशांनी चालकाचे आभार मानले.
- मात्र भंगारात घालण्याची वेळ आलेल्या अनेक बसेस रस्त्यावर धावत असल्याने शेकडो प्रवाशांचे जीव धोक्यात आहेत.
error: Content is protected !!