मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाशी जिल्ह्यातील 52 रूग्णालये संलग्न.
- मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाशी जिल्ह्यातील 52 रूग्णालये संलग्न.
- जिल्ह्यात 610 रुग्णांना 4 कोटी 89 लाख 6 हजार रुपयांचे अर्थसहाय्य वितरीत
- मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष पात्र व गरजू रुग्णांसाठी वरदान ठरत आहे. 1 जानेवारी ते 30 जून दरम्यान बीड जिल्ह्यात 610 रुग्णांना 4 कोटी 89 लाख 6 हजार रुपयांची मदत करण्यात आली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे नोडल अधिकारी तथा वैद्यकीय अधिकारी डॉ. चैतन्य कागदे यांनी दिली.
- राज्यातील नागरिकांना दुर्धर आजारांवरील उपचारासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाकडून आर्थिक सहाय्य देण्यात येते. तसेच आपत्ती प्रसंगीही आर्थिक मदत देण्यात येते. यासाठी राज्यातील कानाकोपऱ्यातून मदत मिळविण्यासाठी नागरिक मंत्रालयात जात असत. परंतु नागरिकांना या सेवा सहजपणे त्यांच्या जिल्ह्याच्या ठिकाणी उपलब्ध व्हाव्यात, म्हणून आता प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. सध्या बीड येथे हा कक्ष जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीत कार्यरत आहे.
- वैद्यकीय मदत मिळण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाशी संलग्नित जिल्ह्यातील 52 रुग्णालयांचा समावेश आहे. या निधीच्या मदतीतून रुग्ण या रुग्णालयात उपचार करुन घेतात.
- संलग्नित रुग्णालयांची यादी पुढीलप्रमाणे.
- बीड शहर
- विठ्ठल हॉस्पिटल, लाईफ लाईन मल्टी स्पेशालिटी सर्जिकल हॉस्पिटल, कृष्णा हॉस्पिटल, सावळकर हॉस्पिटल, स्वामी विवेकानंद मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, संकल्प हॉस्पिटल, गुरुकृपा ॲक्सिडेंट हॉस्पिटल आणि डायग्नोस्टिक सेंटर, रेणू हॉस्पिटल, बार्शी रोड, हाके हॉस्पिटल, फोनिक्स क्रिटिकल केअर अँड सर्जिकल युनिट, दीप हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर युनिट, श्री माऊली हॉस्पिटल (क्रिटिकल सर्जिकल), साईबाबा हॉस्पिटल, ओम सर्जिकल हॉस्पिटल, जालना रोड, तुळशी क्लिनिक, यश हॉस्पिटल, बार्शी रोड, आनंद हॉस्पिटल, जालना रोड, वीर्यान हॉस्पिटल, देशमुख हॉस्पिटल, जालना रोड, श्री बाल रुग्णालय, जुने बीड, यशवंतराव जाधव स्मारक रुग्णालय आणि संशोधन केंद्र प्रा. लि., सुश्रुत मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, स्पंदन हॉस्पिटल, नोबल मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, ॲलन हॉस्पिटल, गौरी हॉस्पिटल, लाड बाल रुग्णालय, जीएसके हेल्थकेअर एलएलपी, जुने बीड, काकू नाना मेमोरिअल हॉस्पिटल, यशवंत मातृ रुग्णालय, योगीराज हॉस्पिटल आणि आयसीयू, लाईफ लाईन हॉस्पिटल, नगर नाका, जीएसके हेल्थ केअर एलएलपी, महिला कॉलेज रोड, नवीन बीड, नीरा बाल रुग्णालय, डी.पी. रोड, फोनिक्स क्रिटिकल केअर आणि सर्जिकल युनिट, जालना रोड, घोलवे हॉस्पिटल, भाग्य नगर, सूर्या मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आणि क्रिटिकल केअर युनिट, डी.पी. रोड, आयकॉन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, महानंदा हॉस्पिटल, श्री बाल रुग्णालय, जनाई बाल रुग्णालय, श्री नारायणी चाइल्ड केअर युनिट, वेलनेस मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, संजिवनी हॉस्पिटल आणि क्रिटिकल केअर
- परळी वैजनाथ
- श्रीकृष्ण ॲक्सिडेंट हॉस्पिटल, कराड हॉस्पिटल, श्री समर्थ हॉस्पिटल
- अंबाजोगाई
- आशा इंटेन्सिव्ह केअर युनिट आणि रिसर्च सेंटर
- माजलगाव
- शतायुषी फाउंडेशन, यशवंत हॉस्पिटल अँड क्रिटिकेअर
- आष्टी
- शेंडगे हॉस्पिटल, कडा
- गेवराई
- आधार मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर
- *****
error: Content is protected !!