- राज्यभरातील विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी ; उद्या दहावीचा निकाल जाहीर होणार..
- पुणे प्रतिनिधी : दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा दहावीचा निकाल उद्या म्हणजेच १३ मे रोजी जाहीर होणार आहे. १३ मे रोजी सकाळी ११ वाजता बोर्डाचे अध्यक्ष निकाल जाहीर करतील. नंतर १ वाजता अधिकृत संकेतस्थळावरून विद्यार्थ्यांना हा निकाल पाहता येणार आहे.
- महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडाळाच्या बारावीच्या निकालानंतर दहावीचे विद्यार्थी आपल्या निकालाच्या प्रतिक्षेत होते. अनेक अंदाज आणि संभाव्य तारखाही समोर येत होत्या. बोर्डाकडूनही अधिकृत माहिती समोर आलेली नव्हती.
- मात्र, आता बोर्डाने अधिकृतपणे दहावीच्या निकालाबाबत घोषणा केली आहे. दहावीचा निकाल उद्या म्हणजेच १३ मे रोजी जाहीर होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
- निकाल पाहण्यासाठी वेबसाईट :
- 1 mahresult.nic.in.
- 2 sscresult.mkcl.org.
- 3:sscresult.mahahsscboard.in.
- 4 https://www.mahahsscboard.in