सामाजिक सेवेचा पुरस्कार साखरे बोरगाव चे सुपूत्र अजिंक्य जगदाळे यांना जाहीर..
- सामाजिक सेवेचा पुरस्कार साखरे बोरगाव चे सुपूत्र अजिंक्य जगदाळे यांना जाहीर..
- अजिंक्य जगदाळे यांच्या कामाची युवा महाराष्ट्र फाउंडेशन ने घेतली दखल..
- बीड प्रतिनिधी – बीड जिल्ह्यातील साखरे बोरगाव चे सुपुत्र अजिंक्य जगदाळे हे सतत सामाजिक कार्यात अग्रेसर असतात. गोरगरिबांच्या अडचणीत धावून जाणारा अजिंक्य जगदाळे म्हणून ओळख निर्माण झालेली आहे. याच कामाची पावती म्हणून युवा महाराष्ट्र फाउंडेशनने त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे. युवा महाराष्ट्र फाउंडेशन प्रत्येक वर्षी महाराष्ट्रातील सामाजिक कार्य तसेच अनेक क्षेत्रातील मान्यवरांचा पुरस्कार देत सन्मान करण्यात येतो यावर्षी बीड जिल्ह्यातील साखरे बोरगाव चे सुपुत्र अजिंक्य जगदाळे यांचे सामाजिक कार्याची दखल घेत हा पुरस्कार त्यांना जाहीर करण्यात आलेला आहे. गावामध्ये त्यांनी अनेक गोरगरिबांना मदती तसेच अनेक प्रश्नांवर आवाज उठवत गावकऱ्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. एक तरुण आणि तडफदार नेतृत्व म्हणून अजिंक्य जगदाळे यांच्याकडे पाहिले जाते. सामाजिक कार्य असो किंवा कोणतेही कार्य असले की अजिंक्य जगदाळे हे पुढे होऊन करतात.ते करत असलेल्या कामाची दखल घेत युवा महाराष्ट्र फाउंडेशन यांनी महाराष्ट्र भूषण सन्मान पुरस्कारसाठी निवड केली आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना युवा महाराष्ट्र फाउंडेशन यांनी महाराष्ट्र भूषण 2025 चा सन्मान पुरस्कार जाहीर केलेला आहे. यामध्ये अनेक दिगजांचा सन्मान सोहळा पार पडणार आहे. पुरस्कार वितरण 23 एप्रिल 2025 रोजी दुपारी बारा वाजता पार पडणार आहे. पुरस्कार वितरणासाठी पूजा राठोड अभिनेत्री, इलक्षी गुप्ता अभिनेत्री तानाजी चित्रपट, हसीनी सुधीर अभिनेत्री साउथ चित्रपट, रुचिरा जाधव अभिनेत्री लागीर प्रेमाचं, या पुरस्कार सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहे. हा गौरव बीड जिल्ह्यासाठी अत्यंत अभिमानास्पद आहे इतर समाजसेवकांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.
error: Content is protected !!