जि.प.प्रा.शाळा तांदळवाडी घाट शाळेत इयत्ता सातवी विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न
- जि.प.प्रा.शाळा तांदळवाडी घाट शाळेत इयत्ता सातवी विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न
- बीड प्रतिनिधी : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,तांदळवाडी (घाट)येथे इयत्ता सातवी विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात साजरा करण्यात आला.निरोप समारंभ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री.प्रशांतजी खोसे (अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती) ,प्रमुख पाहुणे मा.श्यामजी डाके सर (मुख्याध्यापक तांदळेश्वर विद्यालय), श्री.सुशीलजी उजगरे सर (निपुण महाराष्ट्र),श्री.लक्ष्मण क्षीरसागर सर (मुख्याध्यापक जि.प.प्रा.शा. तांदळवाडी घाट),सहशिक्षक श्री.राजा काटे सर,श्री.महेश फसले सर,श्री.विलास खोसे सर,श्रीम.शिंदे मॅडम,श्रीम.यमपुरे मॅडम यांची उपस्थिती होती.
- निरोप समारंभ कार्यक्रमात इयत्ता सहावी च्या सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या सातवी च्या मित्र मैत्रिणी विषयीचे मनोगत व्यक्त केले,व आपल्या भावना व्यक्त केल्या.त्यानंतर सातवी च्या विद्यार्थ्यांनी शाळेविषयी, शिक्षकांविषयी च्या आपल्या भावना मांडताना त्यांचा कंठ दाटून आला..नंतर सर्व शिक्षकांनी सातवीच्या विद्यार्थ्यांबद्दलच्या आठवणी आपल्या मनोगतातून व्यक्त करून विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या.
- कार्यक्रमाचे अध्यक्ष शा.व्य.स.चे अध्यक्ष प्रशांतजी खोसे यांनी आपल्या मनोगतातून शाळेला व शिक्षकांना कधीच विसरू नका अशी अनमोल इच्छा व्यक्त केली, तांदळेश्वर विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.श्यामजी डाके सर यांनी आपल्या मार्गदर्शनातून पुढील शिक्षणासाठी त्यांच्याकडे येणाऱ्या या विद्यार्थ्यांना यशस्वीतेसाठी सर्व अध्यापक वर्ग मेहनत घेऊ असे सांगितले ,निपुण भारत चे श्री.उजगरे सर यांनी सातवीच्या विद्यार्थ्यांनी केलेल्या अतिशय सुंदर व ह्रदयस्पर्शी केलेल्या भाषणाचे कौतुक केले व त्यांनी सादर केलेली “पाठीवरती हात ठेऊनी फक्त लढ म्हणा” ही कविता याप्रसंगी विशेष ठरली…
- शाळेचे मुख्याध्यापक मा.क्षीरसागर सर यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.. श्री.काटे सर यांनी आपल्या मनोगतातून मोबाईल चा वापर योग्य कारणासाठी वा अभ्यासासाठीच करावा असे अनमोल मार्गदर्शन केले,तर श्री.खोसे सर यांनी आपल्या मनोगतात सांगितले की राज्यसेवा परीक्षेत मला सातवी आठवी च्या अभ्यासक्रमातील 7 प्रश्न आले होते म्हणून इथून पुढील अभ्यास हा लक्षपूर्वक करा असा मार्मिक सल्ला आपल्या मनोगतातून दिला..तसेच श्री.फसले सरांनी आपल्या मनोगतातून सांगितले की जगात कोणालाच तू मोठे झाल्याचे देखवत नाही फक्त आई वडील व शिक्षक यांनाच असे वाटते की आमच्यापेक्षा तू मोठे व्हावं ..फक्त यांनाच अभिमान वाटतो..म्हणून आईवडील शिक्षकांचे स्वप्न पूर्ण करा खूप मोठे व्हा.
- इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांनी उपयुक्त असणारे दोन व्हाईट बोर्ड शाळेसाठी भेट दिले.निरोप समारंभ कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता सहावी च्या विद्यार्थिनी कु.प्रणाली भागडे कु.हर्षदा सिरसट यांनी केले.तर आभार प्रदर्शन श्री.फसले सरांनी केले..इयत्ता सहावी विद्यार्थ्यांनी केलेल्या नियोजनातून जेवणाचा आस्वाद सर्वांनी घेतला व कार्यक्रम संपन्न झाला..
error: Content is protected !!