जैताळवाडी मधील पेव्हर ब्लॉक चा रस्ता आठ दिवसात झाला खराब..
तक्रार केली म्हणुन इंजिनियर ला पत्रकारांची ऍलर्जी..
बीड प्रतिनिधी – अनेक वर्षांपासून जैताळवाडी गाव हे विकासापासून दूर होते. परंतु नवनिर्वाचित सरपंच तरुण असल्यामुळे गावची चांगली कामे होतील अशी अपेक्षा गावकऱ्यांची होती परंतु फक्त नावालाच सरपंच असलेल्या सरपंच वडील यांनी गावच्या कामात खूप भ्रष्टाचार केला. निकृष्ट दर्जाची कामे सरपंच वडील करताना पाहायला मिळतात. जैताळवाडी गावामध्ये बाबुराव केसकर यांच्या घरापासून ते हरिभाऊ आमटे यांच्या घरापर्यंत गेल्या आठ ते पंधरा दिवसांपूर्वी बनवण्यात आलेल्या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असल्याचे पाहायला मिळाले. आठ दिवसांमध्येच रस्त्याचे पेव्हर ब्लॉक कुठले गेले आहेत. तसेच साईट पट्टा हा सिमेंटचा असल्यामुळे तो पूर्णपणे बाजूला निघून गेलेला आहे. संबंधित पेव्हर ब्लॉक चे काम इंजिनियर आणि सरपंच वडील यांच्या हात मिळव नीमुळे बोगस आणि निकृष्ट दर्जाचे झाले असल्याची चर्चा सध्या ग्रामस्थ करीत आहेत. अनेक गावकऱ्यांनी रस्ता चांगला व्हावा अशी अपेक्षा व्यक्त केली आहे परंतु सरपंच वडील त्याला दुर्लक्ष करतांना पाहायला मिळतात. फक्त सरपंच म्हणून निवडून आलेले फक्त नावाला सरपंच आहेत की काय.?अशी सुद्धा चर्चा गावांमध्ये पाहायला मिळत आहे ? या रस्त्यात खूप मोठा भ्रष्टाचार झाले असल्याची चर्चा ग्रामस्थ करीत असल्याचे पाहायला मिळात आहे,संबंधित पेव्हर ब्लॉग चे काम दहा लक्ष रुपयाचे असून ते 70 ब्रास एवढे करावे लागते परंतु काम हे फक्त 60 ब्रास च्या आसपास झालेले आहे अशी प्रतिक्रिया यावेळी गावकऱ्यांनी दिली. संबंधित इंजिनियर यांना फोनवरून संपर्क साधला असता त्यांनी सुद्धा याकडे दुर्लक्ष केलेले आहे. संबंधित इंजिनियर यांना तक्रार ऐकून घेण्यासाठी पत्रकारांची सुद्धा एलर्जी आहे की काय ? संबंधित इंजिनिअर यांना संपर्क न झाल्यामुळे त्यांना व्हाट्सअप वरती मेसेज केला परंतु त्यांनी पत्रकारांचा मेसेज आल्याचे थेट सरपंच वडील यांना सांगितले आणि सरपंच वडील यांनी गावातील काही प्रमुख लोकांना सांगून पत्रकारांना धमकवण्याचा सुद्धा प्रयत्न केला. संबंधित सुरू असलेले पेव्हर ब्लॉग चे काम हे इंजिनियर आणि सरपंच वडील यांच्या संगनमताने सुरू असून यामध्ये खूप मोठा भ्रष्टाचार सुरू असल्याचा म्हटले जात आहे.