राज्यातील सरकारी शाळांना CBSE पॅटर्न लागू,शिक्षणमंत्र्यांची मोठी घोषणा..
- राज्यातील सरकारी शाळांना CBSE पॅटर्न लागू,शिक्षणमंत्र्यांची मोठी घोषणा..
- मुंबई दि, 20 : राज्य सरकारने शिक्षणासंदर्भात एक मोठा आणि महत्वाचा निर्णय घेतला आहे. राज्यातील सरकारी शाळांना CBSE अभ्यासक्रम लागू करण्यात आला आहे. सर्वसामान्य विद्यार्थी सीबीएसई प्रणालीचे शिक्षण घेऊ शकत नाही. यामुळे राज्य शासनाने महाराष्ट्र शिक्षण मंडळांच्या शाळांमध्ये सीबीएसई शिक्षण सुरु करण्यासंदर्भात सुकाणू समिती नेमली होती. दरम्यान, राज्य अभ्यासक्रम आराखड्याला सुकाणू समितीकडून मान्यता मिळाली आहे. विधान परिषदेत लेखी उत्तर देत शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी यांसदर्भाती मोठी घोषणा केली. राज्यातील राज्य शिक्षण मंडळांच्या शाळांना CBSE अभ्यासक्रम लागू करण्यासंदर्भात सूचना देण्यात आल्या असून यंदाच्या शैक्षणिक वर्षापासूनच स्टेट बोर्ड शाळेतील विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात सीबीएससी पॅटर्न लागू करण्यात येणार आहे. राज्यातील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढावी यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शैक्षणिक वर्ष 2025-2026 या वर्षापासून सीबीएससी पॅटर्न लागू होणार आहे.
error: Content is protected !!