रक्षण करताच भक्षक झाल्याने न्याय कोणाला मागायचा पाटोदा येथील घटनेचा मनसेकडून जाहीर निषेध आरोपीला भर चौकात चाबकाचे फटके द्या -वर्षा जगदाळे
बीड | प्रतिनिधी
पाटोदा पोलीस ठाण्याचे बीट अंमलदार उद्धव गडकर यांनी जागतिक महिला दिनाच्या दिवशीच एका महिलेवर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी बीट अंमलदार याच्यावर बलात्काराचा गुन्हा नोंद करण्यात आला असून अशा नालायक कायद्याच्या रक्षण कर्त्याला भर चौकात नग्न करून चाबकाचे फटके देण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या राज्य महिला उपाध्यक्ष वर्षा जगदाळे यांनी केली आहे.
पाटोदा पोलीस ठाण्यात बीट अंमलदार पदावर कार्यरत असणारे उद्धव गडकर यांच्याकडे कामानिमित्त एक महिला पोलीस ठाण्यात येत होती या संधीचा फायदा घेत महिलेचा मोबाईल क्रमांक घेत तिला मेसेज संभाषण द्वारे जाळ्यात ओढत तिला पाटोदा येथे बोलवून घेत तिच्यावर अत्याचार करण्यात आला. पीडित महिलेच्या फिर्यादी वरून बीट अंमलदार उद्धव गडकर यांच्या विरोधात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. महिला दिना दिवशी असा दुर्देवी प्रकार घडल्याने कायद्याच्या रक्षण कर्त्याला कठोर ती कठोर कारवाई करून त्याला भर चौकात नग्न करून चाबकाचे फटके मारण्यात यावे अशी मागणी महाराष्ट्र निर्माण सेनेच्या महिला विभागाच्या राज्य उपाध्यक्ष वर्षा जगदाळे यांनी केली आहे.