*मस्साजोग ते बीड सदभावना पदयात्रेत सामील व्हा — प्रवीण खोडसे*
*जिल्ह्यात सौ. रजनी ताई पाटील यांनी विशेष लक्ष केंद्रित केल्याची चर्चा*
केज /प्रतिनिधी
राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वात जिल्ह्यातील मसाजोग ते बीड सदभावना पदयात्राचे काँग्रेसच्या वतीने आयोजन करण्यात आले आहे.जिल्ह्यातील काँग्रेस ऍकशन मोडवर आली असून, खासदार सौ. रजनी पाटील यांनी विशेष लक्ष केंद्रित केल्याची चर्चा असून सदरील सदभावना पदयात्रा यशस्वी करण्याच्या अनुषंगाने खासदार रजनी पाटील यांच्या सुचनेवरून व बीड जिल्हा काँग्रेस चे अध्यक्ष राहुल भैय्या सोनवणे यांच्या पुढाकाराने जिल्ह्यातील काँग्रेस पदाधिकारी सक्रिय झालेले आहेत.
बीड जिल्हा हा सामाजिक समता, सहिष्णूता व पुरोगामी विचार तसेच समतावादी विचाराचा वारसा व सामाजिक समतोल अबाधित राखण्यासाठी जिल्ह्यातील राजकारण विरहित समतावादी, पुरोगामी विचार जपणारे व संविधानाचा पुरस्कार करणाऱ्या प्रत्येकाने सदभावना पदयात्रेत सहभागी व्हावे असे आवाहन केज तालुका काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष प्रवीण खोडसे यांनी केले आहे.