तांदळवाडी घाट जिल्हा परिषद शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न.!
बीड, दि,२१– बीड तालुक्यातील तांदळवाडी घाट येथील जि प प्रा शाळेतील वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात संपन्न झाले.. शिवजयंती निमित्त शाळेच्या वतीने वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. मुलांच्या कलागुणांचा प्रत्यक्ष विकास व्हावा यासाठी जि प प्रा शाळा यांच्या वतीने वार्षिक स्नेहसंमेलन दिनांक 20 फेब्रुवारी 2025 रोजी संध्याकाळी संपन्न झाले..
स्नेहसंमेलनाचे उद्घाटन प्रमुख पाहुणे श्री महेश मोटे केंद्रीय मुख्याध्यापक रौळसगाव तसेंच श्री विजय खोसे संचालक शिवाजी महाराज शिक्षक पतसंस्था बीड, राहुल आंधळे केंद्रप्रमुख रौळसगाव तसेंच प्रणिता गंगाखेडकर मॅडम यांच्या हस्ते जिजाऊ व सावित्रीबाई तसेच शिवरायांच्या प्रतिमेच्या पूजनाने करण्यात आले..
यावेळी सरपंच-उपसरपंच,सदस्य तांदळवाडी घाट,जि प प्रा शाळेचे सहशिक्षक फसले सर,काटे सर,खोसे सर,शिंदे मॅडम,यमपुरे मॅडम व मुख्याध्यापक क्षीरसागर सर,सर्व रौळसगाव केंद्रातील मुख्याध्यापक व शिक्षक वृंद,सर्व सहशिक्षक तांदळेश्वर विद्यालय,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सदस्य,सरपंच-उपसरपंच व सदस्य ग्रामपंचायत अंधापुरी घाट तसेंच कार्यक्रमाला आलेले मान्यवर,गावातील तसेंच परिसरातील महिला-पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.