श्री क्षेत्र चाकरवाडी चे सुपुत्र महेश पवार यांची महसूल सहाय्यक पदी निवड..
- श्री क्षेत्र चाकरवाडी चे सुपुत्र महेश पवार यांची महसूल सहाय्यक पदी निवड..
- महसूल अधिकारी झालेल्या महेश पवार ने वडिलांना परत व्यासपीठावर बसवले..
- महसूल अधिकारी महेश पवार यांचा गावकऱ्यांनी केला सत्कार..
- बीड प्रतिनिधी – बीड तालुक्यातील श्री क्षेत्र चाकरवाडी चे माजी सरपंच छत्रभूज पवार यांचे चिरंजीव महेश पवार यांची एमपीएससी परीक्षेत उत्तीर्ण होऊन महसूल सहायक पदी निवड झाली असल्याने बीड तालुक्यातील सर्व स्तरातून अभिनंदन करून कौतुक होत आहे. महेश पवार यांची एमपीएससी परीक्षेत उत्तीर्ण होऊन महसूल सहायक पदी निवड झाल्याबद्दल गावकऱ्यांच्या वतीने मिरवणूक काढत गावकऱ्यांनी स्वागत केले. स्पर्धा परीक्षा आणि त्यासाठीची तयारी ही सामान्यतः कठीण आणि आव्हानात्मक असते. मात्र, अनेक अडचणींवर मात करून महेश पवार याने यश संपादन करून संपूर्ण गावात आपल्या कुटुंबाचा परत एकदा सन्मान वाढवला आहे. या यशाबद्दल चाकरवाडी गावासह संपूर्ण बीड तालुक्यातून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. जिद्द, संघर्षाची तयारी आणि त्याला अभ्यासाची जोड असेल, तर कुठल्याही परिस्थितीवर मात करता येते. यावेळी या कार्यक्रमासाठी उपस्थित ह भ प महादेव महाराज तात्या श्रीक्षेत्र चाकरवाडी, आदर्श पोलीस पाटील नानासाहेब काकडे, ज्ञानोबा आनवणे, महेश पवार यांचे वडील छत्रभूज पवार तसेच नातेवाईक आणि ग्रामस्थ मंडळी मोठया संख्येने उपस्थित होते.
- वडिलांना परत स्टेजवर बसवायचं होतं – महेश पवार
- हे यश सहज मिळालेले नाही. अनेकदा अडचणी आल्या, माझ्या आयुष्यात इथपर्यंत येण्यासाठी खूप अडचणींचा सामना करावा लागला. पण आई-वडिलांनी कायम माझा आत्मविश्वास वाढवला. मेहनत आणि सातत्य हाच यशाचा मार्ग आहे, हा कुटुंबाने संदेश दिला, त्यामुळेच हे सर्व शक्य झाले आहे. माझे वडील या गावचे सरपंच होते ज्या दिवशी माझ्या वडिलांचा पराभव झाला त्या दिवशीच मी ठरवलं माझ्या वडिलांना स्टेजवर बसवणार आणि आज मी माझ्या वडिलांना स्टेजवर बसवल आहे. माझे एक स्वप्न मी पूर्ण केले आहे. माझी आई एवढी कष्ट करायची की माझा ज्यावेळेस या परीक्षेवर कोर्टात केस लागली त्यावेळेस पासून माझ्या आईने कधीच मन लावून जेवण केलं नाही आईचा प्रसंग सांगताना महसूल अधिकारी महेश पवार भारावून गेले.
- – महेश पवार, महसूल सहायक
- हा परिवार वारकरी संप्रदायाचा परिवार आहे – महादेव महाराज ( तात्या)
- लहान असतानाच मी महेश ला चांगलं ओळखत होतो लहान असतानाच महेशने ध्येय हे ठरवले होते एकदा निश्चित केले की ते त्याच्याकडे झोकून द्यायची महेश पवार यांच्या अंगात जिद्द होती. प्रशासकीय सेवेतून तो नक्कीच या चाकरवाडीचे तसेच त्याच्या आई आणि वडिलांचे नावलौकिक केल्याशिवाय तो थांबणार नाही. महाराजांनी महेश पवार यांना पुढील वाटचालीसाठी आशीर्वाद देऊन. शुभेच्छा दिल्या.
- – ह.भ.प. महादेव महाराज तात्या श्रीक्षेत्र चाकरवाडी
error: Content is protected !!