व्हॉइस ऑफ मीडियाच्या बीड जिल्हाध्यक्षपदी जालिंदर धांडे यांची निवड.!
- व्हॉइस ऑफ मीडियाच्या बीड जिल्हाध्यक्षपदी जालिंदर धांडे यांची निवड.!
- बीड प्रतिनिधी : व्हॉइस ऑफ मीडियाच्या बीड जिल्हाध्यक्षपदी प्रारंभचे संपादक जालिंदर धांडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. रविवारी दुपारी या संदर्भात बीड येथे एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीत वाईस ऑफ मीडियाचे संस्थापक अध्यक्ष संदीप काळे यांची ऑनलाईन उपस्थिती होती.
- व्हाईस ऑफ मीडिया ही संघटना पत्रकारांच्या प्रश्नावर गेल्या पाच वर्षापासून देशभरात काम करते. मागील तीन वर्षापासून बीड जिल्हाध्यक्ष म्हणून बालाजी मारगुडे यांनी काम पाहिले. नवीन होतकरू पत्रकारांना जिल्हाध्यक्ष पदावर संधी मिळावी पत्रकारांमध्ये सतत नवीन नेतृत्व तयार व्हावे यासाठी मारगुडे यांनी संपादक जालिंदर धांडे यांचे नाव जिल्हाध्यक्ष पदासाठी सुचविले होते. त्यास पत्रकार सोमनाथ खताळ, आनंद डोंगरे यांनी अनुमोदन दिले.त्यानंतर पत्रकार दिनेश लिंबेकर,सुनील यादव, अमोल मुळे, ज्ञानेश्वर वायबसे,केशव कदम, शुभम खाडे, डॉक्टर गणेश ढवळे,धनंजय जोगडे आदींनी धांडेच्या नावाला सहमती दर्शवली.त्यानंतर व्हॉइस ऑफ मीडियाचे संस्थापक अध्यक्ष संदीप काळे यांनी जालिंदर धांडे यांची जिल्हाध्यक्षपदी निवड जाहीर केली. या निवडीबद्दल त्यांचे बीड जिल्ह्यातील सर्व पत्रकार बांधवाकडून अभिनंदन करण्यात येत आहे.
error: Content is protected !!